Mumbai Traffic: मुंबईकरांनो लक्ष द्या! पश्चिम द्रुतगती महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल

Mumbai News: मुंबईत सुरु असलेल्या रिमझिम पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. यामुळे घरी परतणाऱ्या प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला आहे.
Mumbai Traffic
Mumbai TrafficESakal
Updated on

मुंबई : मुंबईत सुरु असलेल्या रिमझिम पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर वांद्रेहून बोरिवलीकडे जाणाऱ्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. विशेषतः खेरवाडी, सांताक्रुज, विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी आणि गोरेगाव या प्रमुख ठिकाणी वाहनांच्या रांगा लांबचलांब दिसून येत आहेत. यामुळे घरी परतणाऱ्या प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com