esakal | हेरिटेज गॅलरी, खरेदी, मनोरंजन अन्‌ बरंच काही...!
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

हेरिटेज गॅलरी, खरेदी, मनोरंजन अन्‌ बरंच काही...!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील महत्त्वाच्या आणि सर्वाधिक वर्दळीच्या स्थानकांचे नूतनीकरण, पुनर्विकास करण्याचे काम सुरू आहे. भारतीय रेल्वे स्थानक पुनर्विकास महामंडळ (आयआरएसडीसी) द्वारे हे काम करण्याची योजना आखण्यात आली आहे.

सध्या आयआरएसडीसीद्वारे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), दादर, कल्याण, अंधेरीसह बोरिवली स्थानकाचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. येथे रेल्वे मॉल उभारण्यात येईल.  त्यामध्ये खरेदीसह मनोरंजनाचीही साधने असतील. त्यामुळे प्रवाशांच्या सुविधांमध्ये भर पडणार आहे. रेल्वे स्थानकात सध्या पादचारी पूल, सरकते जिने, लिफ्ट या प्रवाशांसाठी सुविधा उभारल्या जात असून, यामध्ये वाढही केली जात आहे. बोरिवली स्थानकात एकूण दहा फलाट असून पाच पादचारी पूल, सात सरकते जिने, सात लिफ्ट आहेत. आणखी तीन सरकत्या जिन्यांचीही येथे भर भरणार आहे. सध्या पादचारी पुलांना स्कायवॉकचीही जोड दिली आहे. तर, पश्चिमेला प्रवाशांना स्थानकापर्यंत येण्यासाठी डेकही उपलब्ध केला आहे.

हेही वाचा: Mumbai : रिक्षांमुळे होतोय प्रवाशांना त्रास

आयआरएसडीसीद्वारे बोरिवली स्थानकाचा पुनर्विकास करण्यात येत आहे. हे काम प्राथमिक टप्प्यात असून त्यासाठी सल्लागार नियुक्ती प्रगतिपथावर आहे, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले. पश्चिम रेल्वेवरील सर्वाधिक बोरिवली गर्दीचे स्थानक म्हणून ओळखले जाते. त्यामुळे गर्दी विभाजन करण्यासाठी या स्थानकाच्या पश्चिम आणि पूर्वेला रेल्वे हद्दीचा आणखीन विकास करता येईल का, याचे नियोजन आयआरएसडीसीकडून केला जाणार आहे.

हेही वाचा: वसई रोड-दिवा-पनवेल मेमू रेल्वे सेवा पूर्ववत

डेक, पूल उभारणीवर भर

विमानतळाच्या धर्तीवर सीएसएमटी आयआरएसडीसीद्वारे विकसित केले जाण्याचे नियोजन आहे. येथे रेल्वे मॉल उभारण्यात येईल.  त्यामध्ये खरेदीसह मनोरंजनाचीही साधने असतील.

२.५४ लाख चौरस मीटरची जागा व्यावसायिक वापरासाठी उपलब्ध होणार आहे. प्रवाशांसाठी गॅलरी, बसण्याची जागा, कॅफेटेरिया, वाहन तळाची जागा निर्माण करण्यात येणार आहे.

लांब पल्ल्याच्या गाड्यांचे तिकीट केंद्र स्थलांतरीत करून इमारतीचा काही भाग पाडला जाईल. त्याऐवजी समोरील सीएसएमटी स्थानकाची भव्य वास्तू पाहण्यासाठी हेरिटेज गॅलरी उभारली जाणार आहे.

रेल्वे स्थानकातील गर्दीच्या प्रवासातून सुटका होण्यासाठी 'डेक' आणि पुलांची उभारणी केली जाणार आहे. सी सीएसएमटी, दादर रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करताना 'डेक' आणि पूल उभारणीवर भर दिली जाईल. डेकवरून स्थानकात ये-जा करण्यासाठी स्वतंत्र मार्ग तयार केल्याने गर्दी विभाजित होईल.

loading image
go to top