महाराष्ट्रासाठी चिंताजनक बातमी! एका दिवसात कोरोनाबाधितांची संख्या 1000 पार

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 May 2020

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 1,76,323 नमुन्यांपैकी 1,62,349 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 15,541जण पॉझिटिव्ह आले आहेत.

मुंबई : आज राज्यात 1281 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 15,822 झाली आहे. तर आज 35 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 583 वर पोचला आहे. तर आज  350 रुग्ण बरे झाले असून, राज्यात आजपर्यंत एकूण 2465 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

नक्की वाचा : म्हणून 'त्या' पाच मुली देणार कोरोनाची अग्निपरीक्षा, जाणून घ्या अधिक...

आज राज्यात 35 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील 18, पुण्यातील 7 , अकोला मनपातील 5, सोलापूर जिल्ह्यात 1, औरंगाबाद शहरात 1, ठाणे शहरात 1 आणि  नांदेड शहरात 1 मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशमधील एका नागरिकाचा मृत्यू आज मुंबईत झाला आहे. 

मोठी बातमी : लॉकडाऊन इफेक्ट ! विकासकामं रखडल्याने कोट्यवधींचा निधी वाळ्या जाणार?

आज झालेल्या मृत्यूंपैकी 22 पुरुष तर 13 महिला आहेत. आज झालेल्या 35 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 13  रुग्ण आहेत तर 19  रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 3 जण 40 वर्षांखालील आहे. या पैकी दोघांच्या इतर आजारांबद्दलची माहिती अप्राप्त आहे. उर्वरित 33 रुग्णांपैकी 23 जणांमध्ये ( 70 %)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोव्हिड-19 मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 583 झाली आहे. 

हे ही वाचा : अन् दारुची दूकाने उघडलीच नाही... नवी मुंबईतील तळीरामांचा हिरमोड
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 1,76,323 नमुन्यांपैकी 1,62,349 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 15,541जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 1026 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 10,820 सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी 47.39  लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

हे नक्की वाचा पुतण्याचं मुख्यमंत्री काकांना पत्र, कोरोना रुग्णांसाठी राज्य सरकारला सुचवले 'हे' उपाय

आज महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री यांनी पुणे संचालक आरोग्य सेवा कार्यालयातील करोना वॉर रुमला भेट दिली. राज्य पातळीवर करोना नियंत्रणाचे काम कशाप्रकारे सुरु आहे, याची मा. मंत्री महोदयांनी माहिती घेतली. यावेळी त्यांनी करोना कॉल सेंटरला भेट देऊन काही नागरिकांशी फोनवरुन स्वतः संवाद साधला. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या प्रभावीपणे सोडविण्यासाठी कॉल सेंटर अधिक परिणामकारकपणे सुरु ठेवण्याच्या सूचना मंत्री महोदयांनी दिल्या. या वेळी आरोग्य खात्याच्या संचालिका डॉ. अर्चना पाटील आणि इतर अधिकारी वर्ग उपस्थित होता. करोना वॉर रुम करत असलेल्या कामाबद्दल मंत्री महोदयांनी समाधान व्यक्त केले.  

नक्की वाचा : लॉकडाऊन पाळा... पन्नास लाख जिंका!

आजपर्यंत राज्यातून 2465 रुग्णांना ते बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 1,98,052 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 13,006 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Highest number of corona patients in maharashtra, diagnosis of 1281 new patients


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Highest number of corona patients in maharashtra, diagnosis of 1281 new patients