esakal | हॉटेल व्यावसायिक आर्थिक संकटात
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

हॉटेल व्यावसायिक आर्थिक संकटात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वसई : दरवर्षी लाखो रुपये लायसन्ससाठी घेतले जातात. जीएसटी (GST) , व्हॅट (VAT) यासह स्थानिक स्वराज्य संस्थेला करदेखील भरतो, तरीही लॉकडाऊनपासून (Lockdown) आम्हाला वेळेचे बंधन कायम ठेवण्यात आले आहे. कोरोना (Corona) रुग्णसंख्या कमी होत आहे, तरीही निर्बंध शिथिल करण्यात आलेले नाहीत. हीच परिस्थिती कायम राहिली, तर आमच्यावर आत्महत्येची वेळ येईल, असा टाहो वसई-विरारमधील (Vasai-Virar) हॉटेल (Hotel) व्यावसायिक फोडत आहेत.

वसई-विरार शहरात रेस्टॉरेन्ट अँड बारची संख्या ३०० हून अधिक आहे; तर वाईन शॉप ४०, बियर शॉप २०० आहेत. दर वर्षी हॉटेलचालकांना आपल्या लायसन्सच्या नूतनीकरणासाठी सात लाख रुपये भरावे लागतात. मात्र पालघर ग्रामीण भागातील हॉटेलचालकांना केवळ ८० हजार रुपये भरावे लागत आहेत. त्यामुळे वसई-विरारमधील हॉटेलचालकांवर आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना आहे. त्यात कोरोनामुळे वेळेचे बंधन असल्याने धंदा नीट होत नाही. मात्र, कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन द्यावे लागत आहे, असे हॉटेल व्यावसायिक सांगत आहेत.

काही दिवसांपूर्वी विरार येथील एका हॉटेलचालकाने आर्थिक चिंतेमुळे आत्महत्या केल्याचे समोर आले. त्यातच काही हॉटेल व्यावसायिक हा व्यवसाय बंद करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. एकीकडे सरकारला हॉटेलचालकांकडून करोडो रुपयांचे शुल्क मिळत आहे. मात्र या व्यावसायिकांवर लादलेले निर्बंध कमी करण्यास सरकार अनुकूल दिसत नाहीत.

हेही वाचा: वेळेवर वेतन करा; अन्यथा आत्मदहनाची परवानगी द्या

लॉकडाऊन शिथिल होताना अनेक व्यवसायांना मुभा देण्यात आली आहे; परंतु हॉटेल सुरू करण्याची परवानगी मिळाली नाही. याबाबत हॉटेल असोसिएशनने आरोग्यमंत्र्यांची भेट घेतली. तसेच या प्रश्नावर तोडगा काढण्याची मागणी केली.

- प्रवीण शेट्टी, माजी महापौर

लॉकडाऊन काळात जे कामगार घरी गेले त्यांना बस, अन्य पर्यायी व्यवस्था करून पुन्हा आणले. एका हॉटेलमुळे शेकडो लोकांना रोजगार मिळतो. मात्र याचा विचार सरकारने अद्याप केला नाही. रात्री ११ पर्यंत रेस्टॉरंट अँड बार सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी.

- हरीश शेट्टी, हॉटेल व्यावसायिक, वसई

loading image
go to top