आणि विद्यार्थ्यांनी आगीच्या लोळांमधून धूम ठोकली...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 फेब्रुवारी 2020

पालघर - मुंबई नजीकच्या पालघर भागात गेल्या काही दिवसात अनेकदा भूकंपाचे धक्के नोंदवले गेलेत. गेल्या काही दिवसातील आकडेवारी काढली तर पालघरमध्ये हजारांच्यावर भूकंपाच्या नोंदी झाल्यात आहे. अशात भूकंपापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आता पालघरच्या एका शाळेतील मुलांना प्रशिक्षण देण्यात आलंय. 

पालघर - मुंबई नजीकच्या पालघर भागात गेल्या काही दिवसात अनेकदा भूकंपाचे धक्के नोंदवले गेलेत. गेल्या काही दिवसातील आकडेवारी काढली तर पालघरमध्ये हजारांच्यावर भूकंपाच्या नोंदी झाल्यात आहे. अशात भूकंपापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आता पालघरच्या एका शाळेतील मुलांना प्रशिक्षण देण्यात आलंय. 

भूकंपापासून बचाव करण्यासाठी देण्यात आलेलं हे प्रशिक्षण अनोखं आहे. गेल्या काही दिवसापासून पालघरमध्ये नागरिक भूकंपाच्या दहशतीखाली जगतायत. अनेकदा या नागरिकांना मैदानात झोपायची वेळ आली आहे. अनेकदा शाळा देखील देखील मैदानातच भरलेल्या आपण पाहिलंय. नक्की पालघर भागातील भूकंपांचं कारण काय? यावर तज्ज्ञांकडून अभ्यास सुरु आहे. 

मोठी बातमी - जेलमध्ये अजमल कसाबने ऐकली 'अजान' आणि....

याच पार्श्वभूमीवर आता पालघर जिल्हा प्रशासनाच्या वतीने विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं. भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात शॉर्ट सर्किट होऊन आग लागू शकते. अशात आगीपासून स्वतःचा कसा बचाव करायला हवा, त्यातून बाहेर पडण्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे, आगीतून कसं बाहेर पडावं हे विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकांचा माध्यमातून सजवून घेतलंय.  

मोठी बातमी - बोकडाचं हाड आणि कुटुंबात झगडा, कारण वाचाल तर हैराण व्हाल..

नक्की कसं दिलं प्रशिक्षण : 

या प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिकांमध्ये जमिनीवर पेपर पसरवले गेलेत. यानंतर त्या पेपरवर पेट्रोल शिंपडून आग लावण्यात आली. यानंतर उपस्थित शाळकरी मुलांना या आगीतून बाहेर पडण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं. या मध्यमातून भूकंपबाधित भागांमध्ये अशा काही दुर्दैवी घटना घडल्यात तर त्याचा कसा सामना करावा हे शिकता आल्याचं विद्यार्थ्यांनी म्हटलंय.  

palghar district school gave training to their students on how to save life during earthquake and short circuit


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: how save life during earthquake and short circuit palghar district school gave training to their students