esakal | शिवसेनेला धक्का! निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश

बोलून बातमी शोधा

Shivsena-to-Congress
शिवसेनेला धक्का! निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश
sakal_logo
By
संदीप पंडित

विरार (मुंबई): विधानसभा निवडणुकींच्या वेळी हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांच्या विरोधात शिवसेनेतून लढलेल्या विजय पाटील (Vijay Patil) यांनी आज शिवसेनेला रामराम ठोकत पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचा हा निर्णय म्हणजे शिवसेनेला (Shivsena) मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. कोरोनाची लाट ओसरल्यावर महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वी सेनेसाठी हा एक धक्का आहे. विजय पाटील हे आधी काँग्रेसमध्येच (Congress) होते. विधानसभा निवडणुकीआधी ते काँग्रेसमधून शिवसेनेत आले आणि आता ते पुन्हा काँग्रेसमध्ये गेले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशानंतर त्यांना लगेचच पालघर जिल्हाध्यक्षपदाची लॉटरीदेखील लागली आहे. (Huge Setback for Shivsena as Bigshot Leader Vijay Patil Joins Congress in Palghar)

img

हेही वाचा: ४५ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणासाठी महाराष्ट्राला मिळाले इतके लाख डोस

मूळचे काँग्रेसचे असलेले विजय पाटील यांनी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांच्यासमोर उमेदवारी देण्यात आली होती. निवडणुकीत विजय पाटील यांना चांगली मतंही मिळाली होती. परंतु त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी गेले आणि विजय पाटील हे शिवसेनेपासून दूर जात असल्याचे चित्र दिसले. त्यातच पंधरा दिवसापूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे विरार येथे आले असता विजय पाटील यांच्या काँग्रेस पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब झाले होते. अखेर आज विजय पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांच्या बंगल्यावर रीतसर पक्षप्रवेश केला.

हेही वाचा: VIDEO: दादरला एक महिला रेल्वेखाली येणार होती पण...

पक्षप्रवेशांतर त्यांच्यावर पक्षाने पालघर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. या पक्षप्रवेशावेळी काँग्रेसची अनेक स्थानिक नेतेमंडळी उपस्थित होती. विजय पाटील यांना मानणारा ख्रिस्ती आणि मुसलमान समाज मोठ्या प्रमाणात आहे. शिवसेनेबरोबर गेल्याने हा समाज त्यांच्यापासून दुरावला होता. आता महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर विजय पाटील हे पुन्हा काँग्रेसमध्ये आल्याने त्याचा फायदा काँग्रेसला होईल, असे म्हटले जात आहे.

हेही वाचा: मूल दत्तक घेणाऱ्यांसाठी बालविकास विभागाची महत्त्वाची सूचना

"मी मूळचा काँग्रेसवाला. शिवसेनेतील वातावरण मला रूचले झाले नाही. वसईमध्ये मोठ्या प्रमाणत ख्रिस्ती आणि मुसलमान समाज असून त्यांचे माझ्यावर प्रेम आहे. निवडणुकीत हे दोन समाज नाराज झाल्याने त्याचे मला नुकसान झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला उमेदवारी दिली होती. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आता काँग्रेसच्या नेत्यांनी परत मला काँग्रेसमध्ये घेऊन एक वेगळी जबाबदारी माझ्यावर टाकली आहे. ती पार पाडण्याचा मी प्रयत्न करीन", असं विजय पाटील म्हणाले.

"एका वाक्यात बोलायचं तर, 'ते आले आणि ते गेले'. शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली. मानसन्मान दिला. अजून काय द्यायला हवं होतं माहिती नाही. पण आता ते गेले आहे. त्यामुळे यावर मी काही बोलणार नाही.

-रवींद्र फाटक ,शिवसेना आमदार व संपर्क प्रमुख