डॉक्टरांच्या सल्ल्यांशिवाय औषधं घेताय? चुकीच्या औषधोपचारांमुळे हृदयविकार वाढण्याचा तज्ज्ञांचे इशारा 

डॉक्टरांच्या सल्ल्यांशिवाय औषधं घेताय? चुकीच्या औषधोपचारांमुळे हृदयविकार वाढण्याचा तज्ज्ञांचे इशारा 

मुंबई : मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरु झाल्याने अनेकजण घरामध्ये अडकून पडले. जून महिन्यापासून थोडेफार निर्बंध हटवल्यानंतर जीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली असली तरीही कोरोनाच्या भीतीमुळे अनेक नागरिक आजही घरात आहेत. काम नसल्याने लॉकडाऊनच्या काळात जीवनशैली आणि कार्यपद्धतीत बदल झाले आहेत. दिवसभर लॅपटॉप समोर बसून काम करणे किंवा तासनतास टीव्ही पाहण्यामुळे डोळे, मान, खांदे, पाठ, कंबर आणि पाय दुखण्याच्या समस्येनं डोकं वर काढल्याचं अनेक जण तक्रार करत आहेत. शिवाय वाढलेल्या वजनाची चिंता वाढली. हे वाढलेल्या वजन कमी करण्यासाठी ऑनलाइन म्हणजेच इंटरनेटवरच्या माहितीद्वारे उपचार करत आहेत. हे आरोग्याच्या दृष्टीने खूपच धोकादायक असून याचा परिणाम हृदयावर देखील होऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. 

कोरोना काळात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कोणती औषधे घ्यावी या विषयांवर इंटरनेटवर माहिती घेऊन अनेकजण स्वतः उपचार करत आहेत. विविध औषधांच्या सर्रास वापरामुळे अनेकांना समस्यांना त्रासांना सामोरे जावे लागत आहेत. याविषयी अधिक माहिती देताना शुश्रूषा हार्ट केयर हॉस्पिटलचे संचालक डॉ. संजय तारळेकर यांनी सांगितले की, गेल्या सहा महिन्यात अनेक नागरिक घराबाहेर न पडल्यामुळे वजन वाढल्याच्या तक्रारी करत आहेत. 

कोरोना संक्रमणाच्या काळामध्ये वजन वाढण्यामागे रोजच्या आहारातील बदललेल्या सवयी, कोरोनापासून बचाव करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेत असलेली औषधे, लॉकडाऊनमुळे नोकरी धंद्यामध्ये आलेले अपयश, चिंता, कुटुंबातील वादविवाद, अनुवंशिकतेमुळे होणारे आजार आणि एकूणच कोरोनामुळे आलेली अनिश्चितता अशी अनेक कारणे आहेत. त्यामुळे कोणतेही उपचार करण्यापूर्वी आपल्या शरीरात काय बदल झाले आहेत हे जाणून घेणे खूपच गरजेचे आहे. 

रक्तदाब, मधुमेह आणि इतर वैद्यकीय तपासणी करून वाढलेल्या वजनावर औषध घेणे हितकारक ठरेल. अनेक नागरिक इंटरनेटवर असलेल्या जाहिराती पाहून औषधे घेतात. अनेक वेळा या औषधांमुळे हृदयविकार व पक्षाघातासारखे आजार होण्याची शक्यता असल्याचे डॉ तारळेकर म्हणाले. नेमकी कोणती औषधे आपण घेत आहोत याची कल्पना उपचार करणाऱ्या प्रत्येक डॉक्टरांना देणे जरूरीचे असते. कोरोना संक्रमण काळामध्ये आपल्या आरोग्याची सध्यस्थिती काय आहे. यासाठी रक्तशर्करेची पातळी, रक्तदाब नियमितपणे तपासून घ्यायला हवा तसेच हृदयविकार टाळण्यासाठी नियमित लिपिड प्रोफाइल, रक्तशर्करा तपासण्या करणं गरजेचं आहे अशी माहिती डॉ. तारळेकर यांनी दिली.
----
संपादन : ऋषिराज तायडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com