कोरोनाचा 'असाही' धसका, थेट परिणाम झालाय घरच्या जेवणावर; वाचा नक्की झालंय काय 

कोरोनाचा 'असाही' धसका, थेट परिणाम झालाय घरच्या जेवणावर; वाचा नक्की झालंय काय 

मुंबई : कोरोना संसर्ग होण्याच्या भितीने नागरिक घरच्या जेवणावर अधिक भर दिल्याचे चित्र आहे. 3 महिन्यापुर्वी केंद्र सरकारने  रेस्टारेंट उघडण्यास परवानगी दिली होती. मात्र या काळात हॉटेलकडे लोक फिरकलेच नसल्याचे चित्र आहे.

हॉटेलमध्ये जेवण्यापेक्षा घरपोच जेवण मागवून घेण्याला ग्राहकांनी अधिक पसंती दिली. या 60 दिवसात 70 टक्के नागरिकांनी बाहेरचे जेवण्यावर अघोषित बहिष्कार टाकला होता. केवळ 4 टक्के नागरिकांनी रेस्टारेंटमधील जेवणाचा आस्वाद घेतलाय. भविष्यातही  रेस्तराँमध्ये जाण्यापेक्षा घरीच जेवण मागवून घेण्याचा विचार नागरिकांचा आहे. लोकल सर्कल या कंपनीने देशभरात केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती पुढे आली आहे. या सर्व्हेकरीता देभरातील 33 हजार ग्राहकांशी संवाद साधला गेला. 

सर्व्हेतील ठळक बाबी  : - 

  • कोविडच्या भितीमुळे घरच्या जेवणाला प्राधान्य
  • गेल्या दोन महिन्यात 28 टक्के लोकांनी हॉटेलचे जेवणाला पसंती 
  • 70 टक्के लोकांनी हॉटेलचे/बाहेरचे जेवण टाळले 
  • आगामी 60 दिवसात  34 टक्के लोकांचा बाहेरच्या जेवणाचा बेत 
  • भविष्यात घरपोच जेवण मागवण्याचा अधिक कल
  • घरपोच जेवणात 46 टक्क्यांची भारतीय जेवणाला पसंती

घरचे जेवण बरे 

देशभरात रेस्टारेंट उघडून 3 महिन्यापेक्षा अधिक काळ लोटून गेला आहे. महाराष्ट्र आणि राज्यात अजूनही रेस्टारेंटमध्ये खाण्यास परवानगी मिळालेली नाही. मात्र या 60 दिवसात हॉटेलमध्ये जेवणाऱ्यांची संख्या नगण्य आहे. जवळपास 70 टक्के ग्राहकांनी बाहेरचे जेवण टाळणे पसंत केले. म्हणजे बहुताशं ग्राहक  रेस्तराँमध्ये गेले नाही, किंवा घरपोच जेवणही मागवले नाही. केवळ 2 टक्के नागरिकांनी आम्ही अनेकदा   रेस्तराँमध्ये  जेवल्याचे सांगीतल. 3 टक्के लोकांनी एकदा जेवल्याचे म्हटलंय. तर 21 टक्के ग्राहकांनी घरपोच जेवण मागवून घेतल्याचे म्हटलंय.

महत्त्वाची बातमी - आणखी एक मोठा स्कॅम? आता स्टेट बँक ऑफ इंडियाची फसवणूक
भविष्यातही होम डिलीव्हरीला पसंती 

या सर्व्हेमध्ये भविष्यात ग्राहकांचा रेस्टारेंटमध्ये जाण्याचा विचार आहे का , याचाही धांडोळा घेण्यात आला. पुढच्या 60 दिवसात तूम्ही हॉटेलमध्ये जेवायला जाणार का, असा प्रश्न नागरिकांना विचारला गेला. त्यावेळी केवळ 34 टक्के नागरिकांनी रेस्टारेंटमध्ये जेवण्याचा बेत असल्याच उत्तर दिले आहे.यामध्ये बहुतांश जण घरपोच जेवण मागवणार आहे. जवळपास 62 टक्के लोकांनी हॉटेलमध्ये जाणे किंवा घरपोच जेवण मागवण्याचा कुठलाही विचार नसल्याचे सांगीतले. 

भारतीय जेवणाला प्राधान्य

कुठल्या प्रकारचे जेवण मागवण्याचा तूमचा विचार आहे असाही प्रश्न ग्राहकांना विचारला गेला. त्यावर 11 टक्के नागरिकांनी  आंतराष्ट्रीय मेन्यू, 46 टक्के नागरिकांनी भारतीय जेवण मागवणार असल्याचे सांगितले आहे. तर 6 टक्के लोकानी फास्ट फूड, 14 टक्के नागरिकांनी गोड किवा बेकरी पदार्थ मागवणार असल्याचे म्हटले. यापैकी 14 टक्के नागरिकांचा मासाहारी जेवणाचा बेत असल्याची माहिती त्यांनी दिलीये.

कोरोनाचा फटका 

कोरोनामुळे हॉटेल,   रेस्तराँ क्षेत्राला जबर फटका बसला आहे. या फटक्यातून अजूनही हा उद्योग सावरु शकला नाही. झोमॅटो, स्विगी या  होम डिलीव्हरी सेवेतील अग्रगण्य कंपन्यांनीदेखील त्यांचा व्यवसाय गतवर्षीच्या तुलनेत केवळ 50 टक्के जाग्यावर आल्याचे म्हटले आहे. मुंबईसह राज्यात अजूनही डायनिंग रेस्टारेंटला परवानगी मिळाली नाही. त्यामुळे  40 ते 50 टक्के हॉटेल बंद होण्याच्या मार्गावर आहेत. ग्राहकाचा हा कल बघता  हॉटेल क्षेत्र अधिकच गोत्यात जाण्याची शक्यता असल्याचे जाणकारांनी म्हटले आहे. 

लोकांच्या मनात कोरोना संसर्गाची भिती आहे. मात्र आम्ही कोविडचे सर्व नियम पाळण्यास, स्वच्छता ठेवायला सज्ज आहोत. रेस्तराँ उघडल्यावर प्रत्यक्ष ग्राहक यायला सुरुवात झाली, तर त्यांच्या मनातील भिती कमी होण्यास मदत होईल. मात्र सरकारने रेस्तराँ उघडण्यासाठी पुढाकार घेतला पाहीजे असं आहार संघटना अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी म्हटलंय.

( संकलन - सुमित बागुल )

important survey reviled that most of the people are not interested in visiting restaurant amid corona

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com