esakal | खुळूखुळू थांबली... तरी गणेशोत्सवाची संधी साधली
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

खुळूखुळू थांबली... तरी गणेशोत्सवाची संधी साधली

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

डोंबिवली : शहरातील गर्दीच्या रहाटगाड्यात रसवंतिगृहांमधील घुंगरांचा आवाज आला, की पावले आपोआप उसाच्या मधुर रसाचा स्वाद घेण्यासाठी दुकानात वळतात. कोरोनाच्या (Corona) तडाख्यात सर्वसामान्यांप्रमाणे रसवंतीगृह चालकही सापडले. त्यामुळे या घुंगरांचा आवाज काहीसा बंद झाल्याचे चित्र आहे. याही परिस्थितीत रसवंती गृहचालकांनी हार न मानता अन्य जोड व्यवसायांचा (Business) पर्याय स्वीकारत आपला व्यावसायिक गाडा सुरूच ठेवला आहे. सध्या या व्यावसायिकांच्या मदतीला लाडका धावून आला असून, गणेशोत्सवानिमित्त अनेकांनी सजावट, पूजेचे साहित्य, मूर्ती विक्रीचा व्यवसाय सुरू केल्याचे कल्याण-डोंबिवलीत (kalyan-Dombivali) दिसून येत आहे. कल्याण-डोंबिवलीत १०० ते १५० हून अधिक रसवंतिगृह आहेत.

पुण्याजवळील सासवडमधील बोपगावातील ही सर्व मंडळी असून त्यांच्या दोन ते तीन पिढ्या शहरात हा व्यवसाय करीत आहेत. उन्हाळ्यात उसाच्या रसाला मोठी मागणी असल तरी पावसाळ्यात मात्र हवा तसा व्यवसाय होत नाही. कोरोनाने तर होता नव्हता तोही व्यवसाय हिरावला. एकूणच व्यवसायावर ६० ते ७० टक्के परिणाम झाल्याने अनेकांनी जोडधंदा स्वीकारला आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या या व्यावसायिकांच्या मदतीला मोरया सध्या आला आहे. बाप्पा धावून गणेशोत्सवानिमित्त काही व्यावसायिकांनी आपले उसाच्या रसाचा ठेला बाजूला ठेवून गणपती सजावट साहित्य, गणेश मूर्ती, पूजेचे साहित्य विक्री असे जोड व्यवसाय सुरू केले आहेत; तर कोणी कायमस्वरूपी आरोग्यवर्धक गुळाचा चहा विक्री, गुळाचे पदार्थ, खाद्य पदार्थ विक्री सुरू केली आहे.

हेही वाचा: पुण्याजवळील घाटमाथ्याला ‘ऑरेंज अलर्ट’

कोणी इतर व्यावसायिकांना दुकान चालविण्यास भाड्याने दिले आहे. पावसाळ्यात उसाच्या रसाला म्हणावी तशी ग्राहकांची मागणी नसते. त्यामुळे या दिवसांत व्यवसाय कमी होतो; मात्र ही कसर उन्हाळ्यात किंवा ऑक्टोबर महिन्यात भरून निघत होती. कोरोनामुळे गेली दोन वर्षे व्यवसाय नीट झाला नाही. त्यामुळे आर्थिक चक्र सुरू ठेवण्यासाठी अनेकांनी पर्यायी व्यवसाय स्वीकारले. व्यवसायातील नुकसान यामुळे भरून निघणार नसले, तरी आता पर्यायी व्यवसायाचा विचार करण्याची वेळ आमच्यावर आली असून आम्ही त्या दृष्टीने सावरण्याचा प्रयत्न करीत आहोत. सध्याची परिस्थिती ही नक्कीच निवळेल, असा विश्वास या रसवंतिचालकांना आहे.

हेही वाचा: आर्थिक वर्ष 2021-22 पासून तुमची असू शकतात दोन पीएफ खाती

आर्थिक संक सारेच सापड

हातावर हात धरून बस नाही. परिणामी, आम्ही सुरू करण्याचा निर्णय दुकान आहेच. शिवाय ग आल्याने सजावटीसाठी साहित्य, कृत्रिम फुले, क तोरण असा माल आम्ही असणाऱ्या भांडवलातून करून त्याची विक्री कर साहित्याच्या दरात गेल्य १५ ते २० टक्क्यांनी वाढ सोमवारी पिठोरी अमाव खरेदीसाठी भाविकांची सुरुवात होईल.

-सुनील शिंदे, रसवंति डोंबिवली

loading image
go to top