IMA चं आरोग्य मंत्री राजेश टोपेंकडे साकडं, केलीये अंत्यंत महत्त्वाची मागणी 

IMA चं आरोग्य मंत्री राजेश टोपेंकडे साकडं, केलीये अंत्यंत महत्त्वाची मागणी 

मुंबई : डॉक्टरांना होणाऱ्या मारहाणीकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून त्याबाबत लागू केलेल्या कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करावी अश्या मागणीचे साकडे इंडियन मेडिकल असोसिएशनकडून घालण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मंगळवारी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. या बैठकीत खासगी डॉक्टरांना विमा संरक्षण मिळावं याबाबत मागणी केली गेली. त्यावर राज्य सरकार सकारात्मक विचार करेल असे आश्वासन आरोग्यमंत्र्यांनी दिले आहे. 

IMA कडून केल्या गेलेल्या मागण्या- 

लातूर, नाशिक, मालेगाव, अहमदनगर अशा अनेक ठिकाणी कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर हिंसक हल्ले झाले. हल्ले करणाऱ्यांवर भारतीय दंडविधानातील कलमांबरोबरच 1897 एपिडेमिक कायदा (अध्यादेश 22 एप्रिल 2020), महाराष्ट्र मेडिकेअर सर्व्हिस हिंसाचार विरोधी कायदा- 2010 या अन्वये कलमे लावावीत अशा मागण्या करण्यात आल्यात. याबाबतच्या सूचना महाराष्ट्राच्या गृह मंत्रालयाकडून सर्व पोलिस ठाण्यांना आणि अधिकाऱ्यांना कळवण्यात याव्या आणि त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात यावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली. 

यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी डॉक्टरांवर होणारे हल्ले ही शासनाच्या दृष्टीने एक गंभीर बाब असून अशा प्रकारचे गुन्हे घडू नयेत याबाबत दक्षता घेण्याचे मान्य केले आहे. 

कोविड रुग्णांच्या रुग्णालयाच्या शुल्कासंदर्भात सरकारने अधिसूचनेमध्ये काही गंभीर त्रुटी आहेत. महात्मा फुले योजना किंवा अन्य कोविड व्यवस्थापनासाठी नमूद केलेले दर हे अशक्य आणि अव्यवहार्य आहेत. जारी केलेले दर 4 हजार, 7 हजार 500 आणि 9 हजार अनुक्रमे हे कोविडच्या उपचारांसाठी खरोखरच पुरेसे नाहीत. त्यामुळे यापुढे दर ठरवताना सरकारने आयएमएसोबत चर्चा करावी. पीपीइ किट्स, मास्क यांच्या दरावरील नियंत्रण नसल्यामुळे त्यांच्या किमती अवास्तव आकारल्या जात आहेत. त्यावर नियंत्रण आणावे. सरकारी नोकरीतील आरोग्य कर्मचार्यांप्रमाणे खाजगी डॉक्टरांनाही विमा संरक्षण द्यावे. यावरही चर्चा करण्यात आली. 

येत्या दोन दिवसात दर्जेदार मास्क आणि पीपीई किट्स अत्यंत माफक दारात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहे. डॉक्टरांना होणारी मारहाण, डॉक्टरांना विम्याचे संरक्षण अश्या प्रमुख मागण्यांसाठी ही भेट घेतली गेली असं आयएमए, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ.अविनाश भोंडवे म्हणालेत.  

( संकलन - सुमित बागुल ) 

indian medical association chief avinash bhondave met rajesh tope

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com