हे आहे भारतातील पाहिलं 'रॅपिड COVID19 होम स्क्रीनिंग टेस्ट किट'

हे आहे भारतातील पाहिलं 'रॅपिड COVID19 होम स्क्रीनिंग टेस्ट किट'

मुंबई : देशातील पहिली आनुवंशिक आणि सूक्ष्मजीव तपासणी करणारी संस्था बायोनने (Bione) भारतातील पहिले 'रॅपिड कोव्हिड-१९ होम स्क्रीनिंग टेस्ट किट' बाजारात आणले आहे. हे किट वापरायला अगदी सोपे असून काही मिनिटातच आजाराचे निदान होते. या प्राणघातक विषाणूची वेळेतच तपासणी करण्यात हे किट प्रभावी भूमिका बजावेल. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) कडून या किटला परवानगी मिळाली असून योग्य गुणवत्ता तपासणी आणि आश्वासन मिळाल्यानंतर ते बाजारात उतरवले जातील. कंपनी यूएसएफडीएमधील भागीदारांची मान्यता मिळवण्याच्या प्रयत्नात आहे.

कोव्हिड-१९ स्क्रीनिंग टेस्ट किट हे एक आयजीजी व आयजीएमवर आधारीत साधन असल्याने निदान करण्यासाठी हे ५ ते १० मिनिटे घेते. हे किट मिळाल्यानंतर यूझरने आपले बोट अल्कोहलने स्वच्छ करून त्यातून रक्त घेण्यासाठी किटसोबत दिलेल्या लँसेटचा वापर करावा. सोबत दिलेले कार्ट्रिएज रक्ताच्या नमून्याची तपासणी करते आणि अशा प्रकारे ५ ते १० मिनिटात तपासणीचा निकाल मिळतो.

बायोनचे सीईओ डॉ. सुरेंद्र चिकारा म्हणाले, ‘‘आजच्या अभूतपूर्व परिस्थितीत कोव्हिड-१९ होम स्क्रीनिंगट टेस्ट किट हे एक यशस्वी उत्पादन म्हणून उदयास आले आहे. निदानाचा वेळ कमी करून आम्ही भारताचे कोरोनाशी सुरू असलेेल्या युद्धात मदत आम्ही मदत करत आहोत. कोरोना व्हायरसच्या विरुद्ध क्रांती करण्यात सरकार आम्हाला  पाठिंबा देईल, असा आम्हाला विश्वास आहे.”  

जगभरातील सीई आणि एफडीए अधिकृत भागीदारांकडून हे उत्पादन तयार केले गेले असून योग्य गुणवत्ता नियंत्रण सुनिश्चित करूनच सादर करण्यात आले आहे. लॉकडाउनच्या काळात बाहेर न पडता घरात काळजी घेण्याच्या दृष्टीकोनातून हे होम स्क्रीनिंग किट तत्काळ निदान करते. आजाराचे वेळेवर निदान झाल्यास संबंधित वाहक व्यक्तीला तत्काळ वेगळे ठेवल्यास या आजाराचा आणखी प्रसार रोखण्यासाठी या किटची महत्त्वाची मदत होईल. सामान्य स्थिती राहिल्यास कंपनीच्या प्लॅटफॉर्मवर ऑर्डर दिल्यास हे किट २ ते ३ दिवसात उपलब्ध होईल. दर आठवड्यात २० हजार किट पुरवण्यास कंपनी सज्ज आहे.

indias first rapid covid 19 testing kit is introduced by bione

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com