
सकाळ वृत्तसेवा
ठाणे : कार्यकर्ता हीच आपली ताकद आहे, असे सर्वच राजकीय नेते म्हणत असतात. मात्र, कार्यकर्त्यांच्या भावनांना विशेष महत्व देऊन त्यांच्या सुख - दुःखात सहभागी होणारे नेते म्हणून जितेंद्र आव्हाड यांची ओळख आहे. त्याचा प्रत्यय सोमवारी आला, पालिका मुख्यल्याजवळील सर्कल येथे थांबलेल्या एका कार्यकर्त्याने आव्हाडांची भेट घेतली. त्याचवेळी त्याने नवीन घेतलेली रिक्षा चालविण्याची इच्छा व्यक्त करताच आव्हाड त्यांच्या वाहनातून खाली उतरले आणि कार्यकर्त्यांच्या रिक्षाचे सारथ्य करत महापालिका मुख्यालयात पोहोचले.