कोरोनावर मात करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांनी मानले ट्विटद्वारे आभार, म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 मे 2020

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. आव्हाड आता कोरोनामुक्त झाले असून त्यांची प्रकृती ठणठणीत आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. आव्हाड आता कोरोनामुक्त झाले असून त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. आव्हाड सध्या आपल्या घरी विश्रांती घेताहेत. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याची माहिती स्वतः त्यांनी ट्विट करुन दिली आहे. 

मोठी बातमी धक्कादायक ! कोरोनामुळे सहायक पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू

काही दिवसांपूर्वी आव्हाड हे मुंबईतल्या काही कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आले होते.  त्यांनी स्वतःला होम क्वारंटाईन केलं होतं. त्यानंतर आव्हाडांना अचानक ताप आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या सुरक्षा रक्षकांपैकीही एकाला कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली होती. ठाणे नगरपालिकेचे पीआरओ संदीप मालवी यांनी सांगितल्यानंतर, आव्हाडांचे स्वॅब सॅँपल चाचणीसाठी पाठवले होते. रिपोर्ट आल्यानंतर आव्हाडांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाले होते. पहिल्यांदा त्यांना ज्युपिटर रुग्णालयात आणि श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानंतर फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अखेर त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. 

 

मोठी बातमी अडकलेल्या नागरिकांनो! घरी जाण्यासाठी ST महामंडळाशी असा साधा संपर्क

जितेंद्र आव्हाडांनी स्वतः ट्विट करुन याबाबत माहिती दिली. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाशी देत असलेल्या माझ्या लढाईस यश आलेलं असून मी आज सुखरूप घरी जात आहे. यापुढे ही तुमचं प्रेम आणि आशिर्वाद असंच राहू द्या. परत एकदा त्याच उत्साहात आणि त्याच जोमात पुरोगामी महाराष्ट्रासाठी पुन्हा लढण्यास सज्ज होऊया.

 

जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, माझ्या हितचिंतकांना ,कार्यकर्त्यांना माझं एक सांगणं आहे की डॉक्टरांनी एक महिना सक्तीची विश्रांती सांगितल्यामुळे नाईलाजाने मला कुणालाही भेटता येणार नाही त्यामुळे मला कुणीही भेटायला येऊ नये ही माझी एक नम्र विनंती.एक महिन्याच्या विश्रांतीनंतर मी आपल्या सेवेत आणि सोबत कायम असेल.

 

नक्की वाचा : लॉकडाऊनमुळे नोकरी मिळत नाहीये?..घाबरू नका.. अशी मिळवा नोकरी

ट्विटद्वारे आव्हाडांनी रुग्णालय आणि डॉक्टर्स, नर्सचे पण आभार मानले आहेत. आव्हाड पुढे म्हणाले की, माझ्यावर यशस्वी उपचार करणारे फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड येथील सर्व डॉक्टर्स ,नर्सेस ,वॉर्डबॉय आणि इतर सर्व हॉस्पिटल स्टाफ यांचा मी आयुष्यभर ऋणी राहीन त्यांना मनापासून धन्यवाद. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझी पत्नी आणि मुलगी यांच्या प्रेमाची ताकद माझ्या पाठीशी होती असं जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.

Jitendra Awhad, who defeated Corona, thanked him through a tweet


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jitendra Awhad, who defeated Corona, thanked him through a tweet