
परळच्या पुलावर भीषण अपघात; वाहतूक कोंडीने रस्ता भरला
परळमध्ये एकाच वेळी तीन वाहनांची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. होळीच्या दिवशीच झालेल्या या अपघाताने परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली. जवळपास २ किमी पर्यंत रांगा लागल्याची माहिती मिळत आहे. अपघातात जीवितहानी झाल्याची अद्याप कोणतंही वृत्त नाही. मात्र, तीनजण जखमी आहेत. (Paral Accident Update)
दुर्घटना होताच स्थानिकांनी तत्काळ जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. सकाळी 'पिक टाईम'मध्ये या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी सुरू असते. त्यात अपघात झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. (Accident on Paral Bridge of Mumbai)
स्थानिकांनी पोलिसांना कळवल्यानंतर तत्काळ वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अखेर क्रेन बोलवण्यात आली आणि अपघातग्रस्त वाहनांना रस्त्याच्या कडेला घेण्याचं कार्य सुरू झालं. वाहतूक कोंडीमुळे होळीच्या दिवशीही वाहनचालकांना ट्रॅफिकचा सामना करावा लागला.

Accident
मिळालेल्या माहितीनुसार, परळच्या एफ 'साऊथ ब्रिज'वर भीषण अपघात झाला. या अपघातात तिघे जखमी झाले आहेत. अपघातानंतर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.