खासगी रुग्णालयांना कल्याण-डोंबिवली महापालिकेचा इशारा, सहकार्य न केल्यास...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 1 June 2020

कळवा येथे राहणाऱ्या महिलेला कोरोना नसतानाही केवळ कोरोना चाचणीच्या अहवालाअभावी प्राण गमवावे लागले होते. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आणि केडीएमसी प्रशासनाने खासगी रुग्णांलयांबाबत कठोर पाऊल उचलली आहेत. 

कल्याण : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आता कोरोनाची लक्षणे नसलेल्या इतर रुग्णांना खासगी रुग्णालयांकडून प्रवेश नाकारला जात आहे. यामुळे उपचाराअभावी रुग्णांचे हाल होत असल्याने रुग्णाला उपचाराविना पाठवल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी खासगी रुग्णालयांना दिला आहे. 

महत्वाची बातमी : मुंबईत या पाच स्थानकांहून टॅक्सी सेवा सुरु, अशी करा टॅक्सी बुक

खासगी रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला सबंधित यंत्रणेला तपासावेच लागेल. योग्य ती सुरक्षितता घेऊन रुग्णावर उपचार करावे, अशा सूचना पालिका प्रशासनाकडून रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत. यापुढे रुग्णालयात प्रत्येक रुग्णावर उपचार केले जातील, असे न केल्यास संबंधित रुग्णालयावर कठोर कारवाई केली जाईल, असा सज्जड दमच सूर्यवंशी यांनी रुग्णालयांना दिला आहे. तसेच कोरोनाच्या चाचणी लवकर करण्यात यावी असेही सांगण्यात आले आहे.

महत्वाची बातमी : अरे वाह! कोरोनाच्या लढतीत मुंबईकरांच्या हाती आणखी एक यश

कळवा येथे राहणाऱ्या महिलेला कोरोना नसतानाही केवळ कोरोना चाचणीच्या अहवालाअभावी प्राण गमवावे लागले होते. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आणि केडीएमसी प्रशासनाने खासगी रुग्णांलयांबाबत कठोर पाऊल उचलली आहेत. 

नक्की वाचा आदित्य ठाकरेंनी करुन दाखवलं, कोरोनाचा 'हा' हॉटस्पॉट कोरोनामुक्तीच्या दिशेनं 

पालिकेशी संपर्क साधण्याचे आवाहन
कल्याण-डोंबिवली महापालिका परिसरात रुग्णांवर उपचार करण्यास नकार दिला, तर नागरिकांनी 0251-2211373 या नंबरवर संपर्क करावा, असे आवाहन आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.

Kalyan Dombivali Municipal Corporation warns private hospitals if they do not cooperate


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kalyan Dombivali Municipal Corporation warns private hospitals if they do not cooperate