कल्याण-डोंबिवलीमध्ये 'या' कालावधीत रिक्षा, टॅक्सी वाहतूक सेवा पूर्णपणे बंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

कोणत्याही सबबी खाली रिक्षा टॅक्सी रस्त्यावर स्टेशन परिसरात व संबंधित रिक्षा टॅक्सी स्टँडवर पार्किंग किंवा प्रवासी वाहतूक करताना आढळून आल्यास आरटीओ वाहतूक पोलिस पोलिस प्रशासन रिक्षा टॅक्सी जप्त करुन कडक कारवाई करणार आहे.

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगर पालिका हद्दीत कोरोनाबाधित रुग्णाची संख्या वाढत असल्याने  महानगर पालिका हद्दीत 2 जुलै ते 12 जुलै या 10 दिवसात संचारबंदी आणि कडक लॉकडाऊन करणार असल्याची घोषणा पालिकेने केली. त्यानंतर आता शहरात टॅक्सी आणि रिक्षाची पूर्णपणे वाहतूक बंद करण्याचा निर्णय पालिका सभागृह नेते आणि रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशन अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी जाहीर केला आहे .

महत्वाची बातमी : ठाणेकरांनो! उद्यापासून असा असेल 'लॉकडाऊन', प्रशासनाकडून 'नियमावली' जाहीर

कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत कोरोनाबाधित रुग्णाची संख्या वाढत असल्याने ठाणे प्रमाणे कल्याण डोंबिवलीमध्ये लॉकडाऊन करावे अशी मागणी होती त्या धर्तीवर पालिका आयुक्त डॉ विजय सुर्यवंशी यांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी 2 जुलै ते 12 जुलै या दहा दिवस संचारबंदी कडक लॉकडाउन घोषित केले आहे. या धर्तीवर पुढील दहा दिवस अत्यावश्यक ऑन कॉल सर्व प्रकारची रिक्षा टॅक्सी वाहतूक संपूर्ण पणे बंद राहील, कोणत्याही सबबी खाली रिक्षा टॅक्सी रस्त्यावर स्टेशन परिसरात व संबंधित रिक्षा टॅक्सी स्टँडवर पार्किंग किंवा प्रवासी वाहतूक करताना आढळून आल्यास आरटीओ वाहतूक पोलिस पोलिस प्रशासन रिक्षा टॅक्सी जप्त करुन कडक कारवाई करणार आहे.

नक्की वाचा : मुंबईतीलं सलून सुरु झाले खरे, पण छोट्या व्यावसायिकांना भेडसावतोय हा प्रश्न...

रिक्षा टॅक्सी चालकांनी स्टेशन परिसरातील व संबंधित रिक्षा टॅक्सी स्टँडवरुन विनाविलंब काढून घरी लावाव्यात आणि आपली आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांची आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन पालिका सभागृह नेते आणि रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशन अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी केले आहे . अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि रुग्णाचे होऊ शकणारे हाल  याबाबत पेणकर यांनी सांगितले की ऑन कॉल सेवा रिक्षा चालक यादी आरटीओने रद्द केली असून नवीन निर्णय आल्यावर याबाबत विचार करु. मात्र सध्या रुग्ण वाढत असल्याने लॉकडाऊन महत्वाचा असून त्यात आम्ही सहभागी होत पूर्ण रिक्षा आणि टॅक्सी बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पेणकर यांनी स्पष्ट केले.

In Kalyan-Dombivali rickshaw and taxi traffic was completely closed for some period


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Kalyan Dombivali rickshaw and taxi traffic was completely closed for some period