Kalyan Loksabha: डॉ.श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी कधी होणार जाहीर? मोठी अपडेट आली समोर

उल्हासनगरकर सज्ज, साईपक्ष,टीम ओमी कालानी प्रचारात उतरणार| Team Omi Kalani will enter the campaign
shrikant shinde
shrikant shinde sakal

Ulhasnagar News: राजकारणाचे कोणतेही सोयरसुतक नसतानाही प्रथम ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र म्हणून तर दुसऱ्यांदा स्वतःच्या अभ्यासू शैलीने दोन टर्ममध्ये निवडून येणारे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा उमेदवारीचे डोहाळे महायुतीला लागले आहेत

.त्यासाठी काहीशी प्रतीक्षा करावी लागणार असून या आठवड्याभरात किंवा शेवटच्या यादीत यांची उमेदवारी घोषित करण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

shrikant shinde
Ulhasnagar News : उल्हासनगरात साडेबारा कोटी रुपयांचा टॅक्स वसुलीचा नवा उच्चांक

कल्याण लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली नसली तरी डॉ.श्रीकांत शिंदे हेच उमेदवार असणार हे जवळपास निश्चित मानण्यात येत आहे.त्यामुळे काही दिवसांपूर्वी उल्हासनगरात आयोजित करण्यात आलेल्या भाजपा पदाधिकारी मेळाव्यात कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मतभेदांना पूर्णविराम देऊन खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांना निवडून देण्याचे आदेश दिले होते.

यावेळी डॉ.श्रीकांत शिंदे,जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे,आमदार कुमार आयलानी,जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी उपस्थित होते.असेच चित्र लोकसभा क्षेत्रातील अनेक ठिकाणी दिसले.

shrikant shinde
Ulhasnagar Municipal Corporation : उल्हासनगर महानगरपालिकेच्या उपायुक्त पदावर किशोर गवस यांची एन्ट्री

पेशाने डॉक्टर असलेले डॉ.श्रीकांत शिंदे यांची राजकारणातील अनपेक्षित एन्ट्री ही करिश्माई ठरली आहे.त्यामुळे ते दोनदा खासदार म्हणून निवडून आले असून कल्याण लोकसभा मतदार संघात त्यांनी स्वतःचे असे आगळेवेगळे प्रस्थ निर्माण केले आहे.

दिल्लीतील संसदेत डॉ.श्रीकांत शिंदे यांचा दांडगा अभ्यास व युक्तिवाद हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला असून त्यांना ससंदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.टाईमटेबलचा शेड्युल बिझी असतानाही त्यांची जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे,पी.ए अभिजित दरेकर यांच्यासोबत प्रत्येक कार्यक्रमात उपस्थिती दर्शवणारे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचा जिव्हाळा हा उल्हासनगरकरांसाठी हुरूप वाढवणारा ठरू लागला आहे.

महायुतीतील सर्व नेत्यांनी डॉ.श्रीकांत शिंदे यांच्यासाठी कंबर कसल्याचे चित्र असतानाच युथ आयकॉन ओमी कालानी यांनी त्यांची संपूर्ण टीम ही लोकसभा निवडणुकीत डॉ.शिंदे यांचेच काम करणार असल्याचे कमिटमेंट केलेले आहे.

shrikant shinde
Ulhasnagar News : उल्हासनगर परिवहन सेवेच्या इलेक्ट्रॉनिक बसमध्ये प्रवाशांना दोन दिवस फ्री प्रवासाची गिफ्ट

विशेष म्हणजे ओमी कालानी यांची पत्नी पंचम कालानी ह्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी आहेत.दुसरीकडे महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून आशा ईदनानी,जीवन ईदनानी यांचा साईपक्ष देखील डॉ.शिंदे यांच्याशी एकनिष्ठ असल्याने महायुतीतील पक्षांसोबत टीम ओमी कालानी आणि साईपक्ष हे डॉ. शिंदे यांच्या प्रचारात उतरणार आहेत.

दरम्यान कल्याण लोकसभा मतदार संघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कुणाच्या नावाची घोषणा होते याकडेही सर्वांचे लक्ष लागले असून त्यावर राजकारणातील कुरघोड्या आणि रणनीती अवलंबून आहे.

shrikant shinde
Ulhasnagar News : उल्हासनगर परिवहन सेवेच्या इलेक्ट्रॉनिक बसमध्ये प्रवाशांना दोन दिवस फ्री प्रवासाची गिफ्ट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com