ज्युनियर लीडर स्पर्धा: कलाकारांनी दिला विद्यार्थ्यांना कष्टाचा सल्ला

सुचिता करमरकर
मंगळवार, 11 जुलै 2017

कल्याण: तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही क्षेत्र निवडून त्यात तुम्ही यश मिळवा. मात्र. कष्टाला कुठेही पर्याय नाही, असा सल्ला 'सकाळ'च्या ज्युनियर लीडर स्पर्धेतंर्गत सहभागी झालेल्या कलाकारांनी दिला आहे. कलर्स मराठी वाहिनीवरील कॉमेडीची बुलेट ट्रेन या मालिकेतील विशाखा सुभेदार आणि समीर चौघुले तर चाहुल मालिकेतील अक्षर कोठारी या कलाकारांनी कल्याणातील ओक हायस्कूल तसेच सुभेदार वाडा शाळेतील विद्यार्थ्यांशी आज संवाद साधला.

कल्याण: तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही क्षेत्र निवडून त्यात तुम्ही यश मिळवा. मात्र. कष्टाला कुठेही पर्याय नाही, असा सल्ला 'सकाळ'च्या ज्युनियर लीडर स्पर्धेतंर्गत सहभागी झालेल्या कलाकारांनी दिला आहे. कलर्स मराठी वाहिनीवरील कॉमेडीची बुलेट ट्रेन या मालिकेतील विशाखा सुभेदार आणि समीर चौघुले तर चाहुल मालिकेतील अक्षर कोठारी या कलाकारांनी कल्याणातील ओक हायस्कूल तसेच सुभेदार वाडा शाळेतील विद्यार्थ्यांशी आज संवाद साधला.

बालक मंदीर संस्थेच्या ओक हायस्कूल शाळेत सकाळच्या सत्रात शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर या कलाकारांनी गप्पा मारल्या. शाळेतील बँड पथकाने कलाकारांचे स्वागत केले. गुलाब पाकळ्यांच्या वर्षावात हे कलाकार व्यासपीठावर पोहोचले. विशाखा सुभेदार तसेच समीर चौघुले यांनी या स्वागताने भारावून जात आपणही मराठी माध्यमात शिक्षण घेतल्याचे सांगितले. या दोघांनाही त्यांच्या शाळेच्या दिवसांची आठवण झाली. मराठी माध्यमातील प्रेम, गोडवा तसेच आपुलकीचा आपण पुन्हा अनुभव घेतल्याचे त्यांनी सांगितले. शाळा ही प्रत्येकाला स्वतःमधील स्व दाखवतो असे सांगत या दोनही कलाकारांनी विद्यार्थ्यांनी प्रत्येक स्पर्धेत सहभागी झाले पाहिजे, असे सांगितले. सकाळची ज्युनियर लीडर स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. विद्यार्थी वर्गातील वाचनाची आवड वाढावी तसेच त्यांच्यातील कला गुणांना प्रोत्साहन देणारे उपक्रम सकाळ राबवत असल्याबद्दल त्यांनी सकाळचे कौतुक केले. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवण्यासाठी कष्ट करावे लागतात. मात्र, आमच्या क्षेत्रात ते थोडे जास्त असतात असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांनी या कलाकारांना त्यांच्या कामाबाबत त्यांच्या अनुभवाबाबत अनेक प्रश्न विचारले. चाहुल मालिकेतील सर्जाची भमिका करणाऱ्या अक्षर कोठारीलाही विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न विचारले. शाळेतच आपल्याला स्वतःचे गुण समजतात याचा एक अनुभव अक्षरने यावेळी सांगितला. सकाळच्या ज्युनियर लीडर स्पर्धेबद्दल बोलताना अक्षर म्हणाला कि, तुम्हाला या स्पर्धेतून अनेक गोष्टींचे ज्ञान मिळेल. विविध क्षेत्रांतील दिग्गजांची माहिती तुम्हाला होईल. अक्षरनेही सकाळच्या उपक्रमांचे कौतुक केले.

विशाखा सुभेदार आणि समीर चौघुले यांनी त्यांना समाजात वावरताना येणाऱ्या गमतीदार अनुभवांचे किस्से मुलांना सांगितले. आपल्या कारकीर्दीची सुरुवात कशी झाली? विनोद कसा सुचतो यावरही दोघे बोलले. स्वतःवर केला गेलेला विनोद ही विनोदाची सर्वोत्तम जातकुळी असल्याचे या दोघांनी सांगितले. दुसऱ्याचा अपमान करत विनोद करण्यापेक्षा स्वतःवर विनोद करणे आपल्याला आवडते, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :
अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ला, 7 ठार
या हल्ल्याचा तीव्रपणे निषेध करावा : नरेंद्र मोदी
ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचे निधन​

तळेगाव 'MIDC'तील चौथ्या टप्प्याला ग्रामस्थांचा तीव्र विरोध
मुकेश अंबानींच्या "ऍण्टिलिया'ला आग​

Web Title: kalyan news sakal junior leader competition and actor student