esakal | नवरात्रोत्सव मंडळांचेही मंडप शुल्क केडीएमसीने केले माफ
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

नवरात्रोत्सव मंडळांचेही मंडप शुल्क केडीएमसीने केले माफ

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

डोंबिवली : अवघ्या एका दिवसावर नवरात्रोत्सव आला आहे. गणपती पाठोपाठ नवरात्रोत्सव मंडळांनाही मंडप शुल्क महापालिकेने माफ केल्याने मंडळांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. येत्या घटस्थापनेपासून मंदिरे खुली होत आहेत, देवीचा जागर केला जाईल. असे असले तरी गरबा व इतर कार्यक्रमांना परवानगी नाकारण्यात आली असल्याचे पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

हेही वाचा: राज्यशासनाने केळी पीक विम्यात चुक करून शेतकऱयांना फसवीले, आता केंद्रावर खापर फोडताय- खासदार खडसे

राज्यशासनाने नवरात्र उत्सव साजरा करण्या संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करावा. सार्वजनिक मंडळांनी देवीच्या मुर्तीची उंची 4 फूट तर घरगुती मूर्तीची उंची 2 फूट असावी असे सांगितले आहे. तसेच गरबा, दांडिया व इतर कार्यक्रम विसर्जन मिरवणुका यांना परवानगी नाकारण्यात आली आहे. नवरात्र उत्सव मंडळांना गणेशोत्सव मंडळा प्रमाणेच मंडप उभारण्यासाठी निशुल्क परवानगी दिली जाणार असली तरी या मंडळांनी अग्निशामन विभाग तसेच वाहतूक विभागाकडून परवानगी घेणे आवश्यक राहील. कोरोना नियंत्रणात असला तरी सर्व नागरिकांनी कोरोना नियमाचे पालन करत हा उत्सव साजरा करावा असे आवाहन आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी केले आहे.

loading image
go to top