केरळमधील दाम्पत्याला मुंबईतून मूल दत्तक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 जानेवारी 2020

उच्च न्यायालयाची परवानगी 
मुंबईः एकवीस वर्षांपूर्वी लग्न झालेल्या केरळमधील विनापत्य दाम्पत्याला मुंबईतील बाळ दत्तक घेण्याची परवानगी उच्च न्यायालयाने दिली आहे. त्यामुळे त्यांचे आई-बाबा होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

मालाड येथील बालविकास शिशू भवनाने याचिका केली आहे

मालाड येथील बालविकास शिशू भवनाने दत्तक देण्याच्या कार्यवाहीबाबत उच्च न्यायालयात याचिका केली आहे. केरळमध्ये स्थायिक झालेल्या दाम्पत्याला सात महिन्यांचे मूल दत्तक देण्याची परवानगी बालविकास शिशू भवनाने याचिकेद्वारे उच्च न्यायालयाकडे मागितले आहे.

हे पाहाःधक्कादायक! शेतकऱ्यांपेक्षा बेरोजगार करताहेत सर्वाधिक आत्महत्या

आई-वडील होण्याची इच्छा होती; मात्र

आई-वडील होण्याची इच्छा होती; मात्र लग्नानंतर एवढ्या वर्षांमध्ये मूल झाले नाही. त्यामुळे मूल दत्तक घेण्याचा निर्णय घेतल्याचे या पती-पत्नीने सांगितले. बालविकास समिती आणि संबंधित दत्तक समितीनेही दत्तक प्रक्रियेला संमती दिल्यामुळे उच्च न्यायालयाकडे परवानगीसाठी याचिका करण्यात आली आहे. 
या याचिकेवर न्या. गिरीश कुलकर्णी यांच्यापुढे नुकतीच सुनावणी झाली. सामाजिक कार्यकर्त्यांनी सकारात्मक अहवाल दिला आहे. हा अहवालही उच्च न्यायालयात दाखल करण्यात आला.

नक्की वाचाःआरटीई प्रवेश प्रक्रियेबद्दल समाज माध्यमांवर अफवा

आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असलेल्या या दाम्पत्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी छोट्या सदस्याला स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याने त्याला चांगले कुटुंब मिळेल, असे न्यायालयाने म्हटले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kerala couple permitted to adopt child from mumbai