राज्यपालांचं समर्थन करणाऱ्या नितेश राणेंवर पेडणेकरांची टीका; म्हणाल्या, जेव्हा तू गोधडीत होतास...

मुंबईत बोलाताना पेडणेकर यांनी भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
kishori pednekar reaction on nitesh rane statement
kishori pednekar reaction on nitesh rane statement
Summary

मुंबईत बोलाताना पेडणेकर यांनी भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

आमच्या महाराष्ट्राचा आणि मुंबईचा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, असे खडे बोल मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्यपाल कोश्यारींना सुनावले आहेत. आज मुंबईत बोलाताना त्यांनी भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला आहे. यावेळी त्यांनी भाजप आमदार नितेश राणे यांच्या वक्तव्याचाही खरपूस समाचार घेतला आहे. (kishori pednekar reaction on nitesh rane statement)

kishori pednekar reaction on nitesh rane statement
Politics : नितेश राणेंकडून राज्यपालांच्या वक्तव्याचं समर्थन, म्हणाले.. 'कोणाचाही अपमान झालेला नाही'

नितेश राणेंच्या वक्तव्यावर पेडणेकर म्हणाल्या, जेव्हा नितेश राणे गोधडीत होते तेव्हा त्यांचे वडील नारायण राणे हे जीएसटीचे चेअरमन होते. तेव्हापासूनचा इतिहास तपासा, कुणाला कसे मोठे केले ते ही तापसा आणि मग बोला असे म्हणत त्यांनी राणेंना टोला लगावला आहे. राणे पिता-पुत्र ज्या पक्षात जातात त्यांची सुपारी वाजवतात. आधी कॉंग्रसेशी पटलं नाही आणि आता भाजपची सुपारी वाजवतं आहेत. त्यामुळे, सुपारी फॅमिली म्हणून यांच्याकडून कोणता आदर्श घ्यायचा?, असा सवालही पेडणेकर यांनी केला आहे.

पुढे पेडणेकरांनी बोलताना मनसेचं कौतुक केलं आहे. मनसे हा पक्ष कसाही वेगळा झाला असला तरी मराठी न्याय हक्कासाठी आणि हिंदुंसाठी यांनी दिलेल्या स्क्रीप्टला बाजून ठेवून बोलणारच कारण त्यांच्या धमण्यांमध्ये महाराष्ट्र आणि मुंबईचं रक्त वाहत आहे. पुढे त्या म्हणाल्या की, मुंबईचा विकास हा सर्वांनी केला आहे. आताचे सर्व उद्योगपती त्यात किर्लोस्करही होते. राज्यपाल हे स्वतःच्या कामाची दाखल न घेता इतरांची जास्त दखल घेत आहेत, असंही त्यांनी सांगितलं आहे.

kishori pednekar reaction on nitesh rane statement
खोतकरांचा शिंदे गटाला पाठींबा जाहीर; उद्धव ठाकरेंची साथ सोडताना अश्रू अनावर

राज्यपालांना हे कळायला पाहिजे की महाराष्ट्राचे राज्यपाल आहात मात्र त्यांना मराठीचा विसर पडत आहे. आपला महाराष्ट्र आणि आपली मुंबई सर्वांना सामावून घेते. आणि हा गुन्हा असेल तर आम्ही सतत हा गुन्हा करू, असंही त्या म्हणाल्या आहेत. राज्यपाल हे सातत्यानं काही ना काही वादग्रस्त वक्तव्य करत असतात त्यामुळे आता ते जगात प्रसिद्ध झाले आहेत, असा टोमणाही पेडणेकरांनी मारला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com