esakal | #Holi2020: घरच्या घरी 'असे' बनवा होळीचे रंग...... 
sakal

बोलून बातमी शोधा

#Holi2020: घरच्या घरी 'असे' बनवा होळीचे रंग...... 

#Holi2020: घरच्या घरी 'असे' बनवा होळीचे रंग...... 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : होळी म्हणजे रंग उधळून आनंद साजरा करण्याचा सण. होळीत असंख्य रंग बाजारात विक्रीला आले असतात. आपण एकमेकांना रंग लावून होळी साजरी करतो. मात्र बाजारात मिळणाऱ्या या रंगांमध्ये मोठ्या प्रमाणावर रासायनिक पदार्थ वापरले जातात. यामुळे आपल्या त्वचेचं नुकसान होतं किंवा डोळयांना नुकसान होत असतं. मात्र आता चिंता करू नका. घरच्या घरी नैसर्गिक रंग कसे तयार करायचे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

नैसर्गिक रंग हे झाडांची पानं, फुलांच्या पाकळ्या आणि फळं यांचा उपयोग करून बनवण्यात येतात. त्यामुळे तुमच्या शरीराला कोणत्याही प्रकारची ईजा होणार नाही आणि तुम्ही स्वतःच्या त्वचेचं आणि डोळ्यांचं रक्षण करू शकणार आहात.

हेही वाचा: परदेशात वापरलेले मास्क भिवंडीत... 

असे बनवा नैसर्गिक रंग:

(१) पिवळा रंग:

 • हळद, कस्तुरी हळद आणि बेसनाच्या पिठापासून पिवळा रंग तयार करता येतो.
 • पिवळ्या झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या सावलीत सुकवून घ्या.
 • त्यात बेसन पीठ मिसळा आणि कोरडा रंग तयार करा. 
 • ओला रंग तयार करण्यासाठी या फुलांच्या पाकळ्या रात्रभर पाण्यात भिजवत ठेवा. 
 • त्यात हळद टाकून मिश्रण चांगलं उकळवून घ्या.

(२) लाल रंग: 

 • रक्तचंदनाचा वापर करून तुम्ही लाल रंग तयार करू शकता. 
 • रक्तचंदनाच्या खोडाची भुकटी पाण्यात उकळवून थंड करा म्हणजे गडद रंग तयार होईल.
 • जास्वदांच्या फुलापासूनही लाल रंग बनवता येतो. 
 • जास्वंदीची फुलं नाजूक सावलीत वाळवून घ्या. 
 • त्यापासून भुकटी तयार करून घ्या. 
 • ही भुकटी पाण्यामध्ये उकळवून घ्या.
 • या भुकटीला पाण्यात मिसळून  लाल रंग तयार होईल.

हेही वाचा: मुख्याध्यापकच विद्यार्थिनीशी असा वागला...  

(३) हिरवा रंग:

 • गुलमोहर, मेहंदीची पानं आणि गव्हाचे कोंब यांची भुकटी तयार करून रात्रभर पिठामध्ये भिजत ठेवा.
 • कोथिंबीर आणि पालकच्या पानांचा लगदा तयार करून या मिश्रणात मिसळा.
 • हे मिश्रण तुम्ही हिरवा रंग  म्हणून वापरू शकता. 

(४) भगवा रंग:

 • पांगाऱ्याच्या फुलांपासून भगवा रंग तयार करता येईल .
 • यासाठी पांगाऱ्याची फुलं सावलीत वाळवून घ्या.
 • यानंतर त्याची भुकटी बनवून घ्या कोरडा रंग तयार होईल. 
 • ओला भगवा रंग तयार करण्यासाठी पांगाऱ्याची फुलं रात्रभर पाण्यात भिजवत ठेवा. 
 • त्यानंतर हे मिश्रण उकळवून घ्या.
 • अशाप्रकारे सुगंधी भगवा रंग तयार होतो. 

हेही वाचा: अहमदाबादच्या तरुणाने सोशल मीडियावर टाकली अशी पोस्ट आणि.. 

अशाप्रकारे घरच्याघरीच नैसर्गिक होळीचे रंग तयार करा आणि यावर्षी सुरक्षित होळी साजरी करा.

Know how to make natural colors on the occasion of holi 2020