"ते' 40 जण गेले जंगलात आणि घडले असे काही... 

 "ते' 40 जण गेले जंगलात आणि घडले असे काही... 

अलिबाग : अलिबाबा आणि 40 चोरांची गोष्ट आपल्याला प्रत्येकालाच माहित आहे. पण, रोहा तालुक्‍यातील 40 जणांनी असा काही प्रताप केला की, त्याची दखल पोलिसांनाही घ्यावी लागली. या "प्रतापीं'मध्ये एका सरपंचाचाही समावेश आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर ते जंगलात जमले होते. 

"लॉकडाऊनमुळे अनेक जण उपाशीपोटी असताना रोहा तालुक्‍यातील पहूर येथील सरपंचांना मटणाच्या पार्टीचा मोह चांगलाच अंगलट आला. पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या घराशेजारीच जंगल भागात ही ओली पार्टी चालू होती. कोलाड पोलिसांनी केलेल्या कारवाईत सरपांचासह 40 जणांवर गुन्हा दाखल झाला असून, 34 जणांना अटक करण्यात आली होती. यामुळे गावागावात छोट्या-मोठ्या पार्ट्या करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. 

कोणतेही खबरदारी न घेता सुतारवाडी परिसरातील पहूर येथे शुक्रवारी (ता. 24) दुपारच्या सुमारास गावच्या पाखर या हद्दीत येथील सरपंच व ग्रामस्थांनी मटणाच्या जेवणावळीचे (पार्टी) चे आयोजन केले होते. पालकमंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे याच सुतारवाडी परिसरात राहतात. या जेवणावळीची माहिती मिळताच कोलाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत येथील सरपंचास 40 ग्रामस्थांवर कारवाई केली. यातील 34 जणांना अटक करण्यात आली होते. या कारवाईत मटण शिजवण्यासाठी आणलेले 2 मोठे टोप, तसेच मध्यम आकाराचे दोन टोप, भात ठेवण्याचे दोन झरे, स्टील टाकी, दोन स्टीलच्या बादल्या, दोन जग, परात, झाकण, किसण्या, चमचे, काळते, पाण्याचा बॅलर, पत्रावळ्या ग्लास, कोयते कोलाड पोलिसांनी जप्त केले आहेत. याबाबत अधिक तपास कोलाड पोलिस करीत आहेत. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com