Kurla Bus Accident : नोकरीच्या पहिल्या दिवशी घरातून गेली ती गेलीच! कुर्ल्यातील बस अपघातात आफरिनने गमावला जीव
Afreen Shah Death in Kurla Bus Accident: या अपघातात आफरिन शहा आणि कनीज फातिमा या दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. या दोघींच्या मृत्यूनंतर आता हळहळ व्यक्त केली जाते आहे.
Afreen Shah Death On First Day of Job : सोमवारी रात्री कुर्ल्यातील आंबेडकरनगर येथे बेस्ट बसचा अपघात झाला. यावेळी बसने अनेक गाड्यांना धडक दिली आहे. तसेच अनेकांना चिरडले. यात सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर ३० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत.