

Ladki Vidyarthini Scheme Controversy
ESakal
उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेच्या अर्थसंकल्प महासभेत ‘लाडकी विद्यार्थिनी’ योजनेवरून उसळलेला वाद हा केवळ नावापुरता मर्यादित न राहता, थेट योजनेच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह उभे करणारा ठरत आहे. सातवी ते बारावीतील गरजू मुलींसाठी महत्त्वाची ठरणारी ही योजना अद्याप आराखड्याशिवायच चर्चेत आली आणि त्यातच सावित्रीबाई फुले विरुद्ध ज्योती कलानी या नावाच्या राजकारणाने वातावरण तापले. परिणामी, विद्यार्थिनींसाठी अपेक्षित असलेली योजना आता वादाच्या भोवऱ्यात अडकून बारगळण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र दिसत आहे.