
Ganesh Festival Row Lalbaugcha Raja Mandal Counters Accusations
Esakal
लालबाग राजाच्या गणपतीचं विसर्जन लांबल्याच्या मुद्द्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. यंदा लालबागच्या राजाची मूर्ती १० तासांपेक्षा अधिक काळ गिरगाव चौपाटीवर विसर्जनाच्या प्रतीक्षेत होती. अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी गिरगाव चौपाटीवर भरतीच्या आधी मूर्ती नव्या तराफ्यावर चढवता आली नव्हती. यानंतर ओहोटी होईपर्यंत वाट बघावी लागली. शेवटी रात्री १० वाजण्याच्या सुमारास लालबागच्या राजाचं खोल समुद्रात विसर्जन केलं गेलं. यानंतर गिरगाव चौपाटीवरील कोळी बांधवांनी लालबाग राजा मंडळावर अनेक आरोप केले होते. आता याविरोधात लालबाग राजा मंडळाकडून संबंधितांना कोर्टात खेचण्याचा इशारा देण्यात आलाय. गिरगाव चौपाटीचे नाखवा हिरालाल वाडकर यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकण्याचा निर्णय लालबाग राजा मंडळाने घेतलाय.