High Risk Alert : सावधान! ‘Firefox’ अन् ‘Thunderbird’ युजर्सना सायबर हल्ल्यांचा धोका

CERT-In warns Firefox and Thunderbird users : सरकारी सायबर सुरक्षा एजन्सी, CERT-In ने जारी केली महत्त्वाची सूचना, जाणून घ्या नेमकं काय म्हटलं आहे?
Firefox and Thunderbird Users Face Major Cybersecurity Threat

Firefox and Thunderbird Users Face Major Cybersecurity Threat

esakal

Updated on

Firefox and Thunderbird Users Face Major Cybersecurity Threat जर तुम्ही मोझिला फायरफॉक्स किंवा थंडरबर्ड यापैकी कोणत्याही प्लॅटफॉर्मचा वापर करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण, भारत सरकारची सायबर सुरक्षा एजन्सी, CERT-In ने या प्लॅटफॉर्म्सबाबत हाय रिस्क सिक्योरिटी अलर्ट जारी केला आहे. 

कारण, यामध्ये अनेक त्रूटी आढळल्या आहेत, ज्याचा फायदा घेऊन हॅकर्स युजर्सचा डेटा चोरू शकतात. जुने व्हर्जन वापरणारे युजर्स अधिक धोक्याच्या परिस्थितीत आहे. यामुळे सरकारने तत्काळ लेटेस्ट अपडेट इंस्टॉल करण्याचा सल्ला दिला आहे.

सरकारी सायबर सुरक्षा एजन्सी, CERT-In ने त्यांच्या जानेवारी २०२६ च्या सुरक्षा बुलेटिनमध्ये मोझिला फायरफॉक्स आणि थंडरबर्डशी संबंधित अनेक त्रूटी उघड केल्या आहेत. एजन्सीनुसार, या त्रूटी हाय रिस्क श्रेणीत येतात. जर त्यांचा वापर केला गेला तर हॅकर्स युजर्सच्या सिस्टमवर हल्ला करू शकतो. गेल्या काही आठवड्यात अँड्रॉइड आणि अ‍ॅपल युजर्सना अशाच प्रकारच्या सूचना मिळाल्या आहेत. आता, ब्राउझर युजर्ससाठी हा नवीन इशारा जारी करण्यात आला आहे. कारण, याचा लाखो युजर्सवर परिणाम होऊ शकतो.

Firefox and Thunderbird Users Face Major Cybersecurity Threat
Manipur Government Formation Update: मणिपूरमध्ये सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग!, भाजपसह सर्व ‘NDA’ आमदारांना दिल्लीला बोलावले

 रिपोर्टनुसार, फायरफॉक्सच्या अँटी-ट्रॅकिंग, लेआउट स्क्रोलिंग आणि ओव्हरफ्लो या कंपोनंटमध्ये तांत्रिक त्रुटी आढळल्या आहेत. तर थंडरबर्डला अंशतः एन्क्रिप्टेड ईमेल कंटेटमधून डेटा काढण्यास असुरक्षित म्हटले गेले आहे.  एखादा हॅकर्स युजर्सला विशिष्ट लिंक किंवा वेब रिक्वेस्ट ओपन करण्यास लावून फसवू शकतो. एकदा युजर्सनी ती लिंक ओपन केली की, सिस्टममधून संवेदनशील माहिती सहज काढली जाऊ शकते. यामध्ये पासवर्ड, वैयक्तिक डेटा आणि ब्राउझिंग माहिती समाविष्ट असू शकते. तर काही प्रकरणांमध्ये, सिस्टम क्रॅश देखील होऊ शकते.

Firefox and Thunderbird Users Face Major Cybersecurity Threat
Union Budget Impact on Bangladesh: मोदी सरकारने अर्थसंकल्पातून बांगलादेशच्या युनूस सरकारला दिला जबरदस्त दणका!

CERT-In आणि Mozilla नुसार, १४७.०.२ पेक्षा जुने Firefox व्हर्जन वापरणारे युजर्स धोक्यात आहेत. त्याचप्रमाणे, १४०.७.१ आणि १४७.०.१ पेक्षा जुने Thunderbird व्हर्जन देखील असुरक्षित मानल्या गेले आहेत. ज्या युजर्सनी बराच काळ त्यांचे ब्राउझर अपडेट केले नाहीत, त्यांनी त्वरित अपडेट करणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com