विधानपरिषद निवडणूक :आमदारांची पुन्हा पंचतारांकित बडदास्त

‘मविआ’ने आमदारांना मुंबईत बोलाविले; दुसऱ्या उमेदवारासाठी काँग्रेसची धावाधाव
Legislative Council elections Beware mahavikas aghadi call candidate in mumbai
Legislative Council elections Beware mahavikas aghadi call candidate in mumbai sakal

मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी अपेक्षित मतांची तडजोड केल्यानंतरही महाविकास आघाडीचा चौथा उमेदवार पराभूत झाल्याने आता विधानपरिषद निवडणुकीसाठी ‘मविआ’ने सावध पवित्रा घेतला आहे. आपापल्या पक्षांचे अधिकृत उमेदवार विजयासाठी आवश्यक असलेला २७ मतांचा कोटा पूर्ण करतील यासाठीची जोरदार रणनीती आखली जात आहे. आघाडीच्या तिन्ही पक्षांनी यासाठी त्यांच्या आमदारांना उद्यापासूनच (ता.१७) मुंबईत बोलाविले असून त्यांची पंचतारांकित बडदास्त ठेवण्यात आली आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी दोन उमेदवारांना संख्याबळानुसार विजयी होण्यात फारशी अडचण नसली तरी काँग्रेसला मात्र दुसऱ्या उमेदवारासाठी २७ मतांचा कोटा पूर्ण करताना मोठी कसरत करावी लागेल. अपक्ष आणि लहान पक्षांची मते निर्णायक ठरणार असून भाजप व काँग्रेसची या मतांसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. काँग्रेसचे भाई जगताप आणि भाजपचे प्रसाद लाड यांच्यातच खरी चुरस असली तरी गुप्त मतदान असल्याने नेमकी कोणत्या उमेदवाराची विकेट पडणार याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत.

शिवसेनेने त्यांच्या हक्काच्या दोन उमेदवारांसाठी सुरक्षित मतांचा कोटा आखण्याची तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने देखील एकनाथ खडसे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासाठी सुरक्षित अशा ५४ मतांची सुनियोजित आखणी केल्याचे समजते. दरम्यान काँग्रेसकडे जेमतेम ४४ मते असल्याने दुसरे उमेदवार भाई जगताप यांना पहिल्या पसंतीची १६ मते दिली तरीही त्यांना किमान अकरा मतांची बेगमी बाहेरून करावी लागेल.

या अकरा अतिरिक्त मतांमध्ये ‘मविआ’ ला पाठिंबा देणारे अपक्ष आणि लहान पक्ष यांची भूमिका विजयाचे गणित ठरवणार हे निश्चित आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीची मनधरणी करायला सुरूवात केली असून सर्वपक्षीय नेते ठाकूर यांच्या संपर्कात आहेत.

भाजपसमोरही आव्हान

भाजपकडे ११३ मतांची बेरीज असली तरी त्यांचा पाचवा उमेदवार विजयी होण्यासाठी तब्बल २२ मते खेचावी लागणार आहेत त्यामुळे राज्यसभा निवडणुकीपेक्षा भाजपसमोर विधानपरिषदेत पाचवा उमेदवार विजयी करण्याचे कठीण आव्हान आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com