

Leopard Spotted in Matheran
ESakal
मुंबई : पर्यटननगरी माथेरानमध्ये पुन्हा एकदा बिबट्याची दहशत पाहायला मिळाली आहे. हनीमून पॉईंट परिसरात रात्रीच्या वेळी बिबट्याने एका श्वानावर झडप घातल्याची थरारक घटना घडली असून, हा संपूर्ण प्रकार येथील दुकानदार सनगरे यांच्या दुकानाबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.