

Leopard Spotted In Thane
ESakal
मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यभरात बिबट्यांचे हल्ले मोठ्या प्रमाणात वाढले असून आता बिबट्यांचे मानवी वस्तीत वावर देखील होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भोतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतेच भाईंदर येथे एका इमारतीमध्ये बिबट्या दिसला असून त्याने केलेल्या हल्ल्यामध्ये सात जण जखमी झाले होते. मुंबई उपनगरातील हे प्रकरण ज्वलंत असताना आता ठाणे शहरात बिबट्या दिसून आला आहे.