रायगडमध्ये कोरोनाची लाट ओसरली; रुग्णसंख्या दहाच्या आत

Corona Fight
Corona Fightsakal media

अलिबाग : नवीन वर्षाच्या सुरुवातीला रायगड (raigad) जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा (corona third wave) उद्रेक झाला होता. आता ही संख्या झपाट्याने कमी झाली असून जिल्ह्यात अवघे ६४ रुग्ण आहेत. गेल्या आठ दिवसांत नवीन रुग्ण (corona new patients) सापडण्याचे प्रमाणही १० पेक्षा कमी आहे. एका दिवसात रविवारी अवघे पाच रुग्ण सापडले. विशेष म्हणजे पनवेल तालुका वगळता अन्य तालुक्यांत एकही नवीन रुग्ण सापडला नाही. आरोग्य विभागासाठी (health department) ही मोठी दिलासा देणारी बाब ठरली.

Corona Fight
डोंबिवलीत शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण ! शिवसेना शाखेतर्फे भव्य मिरवणूक

कोरोनाच्या पहिल्या दोन लाटांच्या वेळी रायगड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला होता; तर तिसरी लाट सुरू होण्यापूर्वी लसीकरण मोहीम वेगाने सुरू असल्याने त्यानंतर काहीसा दिलासा मिळाला. कोरोनाची तिसरी लाट फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ओसरली. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून दररोज १०० पेक्षा कमी रुग्ण सापडत होते. आता ही संख्या १० पेक्षा कमी आहे. त्यातही दिलासा देणारी बाब म्हणजे १५ तालुक्यांपैकी पनवेल वगळता अन्य तालुक्यांत एकही रुग्ण सापडत नाही.

सध्या पनवेल महापालिका क्षेत्र आणि पनवेल ग्रामीण भागात प्रत्येकी १४-१४ रुग्ण आहेत. त्यानंतर मुरूड ११ आणि उरणमध्ये आठ रुग्ण आहेत. श्रीवर्धन, महाड आणि पोलादपूरमध्ये तर एकही रुग्ण नाही. कोरोनामुळे आतापर्यंत पनवेल महापालिका क्षेत्रात सर्वाधिक १४१६ जणांचा मृत्यू झाला; तर सर्वांत कमी ३१ मृत्यू तळा तालुक्यात झाले.

Corona Fight
शेलारांच 'आयपीएल'प्रेम; सामान्य चाहत्यांसाठी विधानसभेत बॅटिंग

कोरोनावर दृष्टिक्षेप

एक मार्च- २० मार्च
एकूण चाचण्या ---- २४,१५९५८ -------- २४,५४,६३१
बाधित रुग्ण - २,१४,५२९ -------- २,१५,२९४
बरे झालेले रुग्ण - २,०९,५९० -------- २,१०,५३२
एकूण मृत्यू - ४,६९२ -------- ४,६९८
उपचार घेत असलेले रुग्ण २४७ -------- ६४
एका दिवसातील रुग्ण - १३ -------- ५

लसीकरणावर दृष्टिक्षेप
एकूण मात्रा- ४२,९५,८७६
पहिली मात्रा- २२,०५,२१०
दुसरी मात्रा- १९,९२,४३०
वर्धक मात्रा- ३६,७७२

फ्रंट लाइन वर्कर- १,४१,०८९
आरोग्य कर्मचारी- ५२,४०२
१८ ते ४४ वयोगट- १,५७,७३०
४५ ते ६० वयोगट- २४,८०,८३१
६० वर्षांवरील- ९,०८,०१९
१५ ते १७ वयोगट- ४९२

कालपरत्वे समाजात पसरलेल्या विषाणूची तीव्रता हळूहळू कमी होते. त्यानुसार कोरोनाची तीव्रता कमी झाली असावी. तसेच वेळोवेळी केलेल्या चाचण्या, लसीकरणामुळे कोरोना नियंत्रणात आणण्यास यश आले. कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
- डॉ. गजानन गुंजकर, बाह्य विभाग वैद्यकीय अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com