

Game-Changer 'Missing Link' Ready for Launch
Sakal
पाली : मुंबई आणि पुणे या दोन महानगरांमधील प्रवासाचे अंतर आणि वेळ कमी करणाऱ्या बहुप्रतिक्षित यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील (Expressway) 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे काम अखेर पूर्ण झाले आहे. हा मार्ग १ मे २०२६ पासून सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असून, यामुळे घाटातील वाहतूक कोंडीतून प्रवाशांची मोठी सुटका होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि पोलीस प्रशासनाने या मार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्यासंदर्भात अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) प्रवीण साळुंखे यांनी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.