"मेहनत आणि निष्ठा ठेवून काम करत रहा, खूप मोठा होशील.... "

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 29 April 2020

मी लाईफ ऑफ पाय चित्रपटात त्यांच्या लहान पणाची भूमिका केली होती (लहान पाय) त्या भूमिकेचे होणारे कौतुक बघून त्यांनी मला सांगितले होते की मेहनत आणि निष्ठा ठेवून काम करत रहा खूप मोठा होशील.

मुंबई - बॉलिवूड अभिनेता इरफान खान याचे वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झाल्यावर अनेकांनी त्याला श्रद्धांजली वाहिली असतानाच वसई येथील उगवता तारा आणि इरफान खानबरोबर दोन चित्रपटात काम केलेल्या आयुष्य टंडन याने देखील इरफान खान बरोबरच्या आठवणींना उजाळा दिलाय. 

लाईफ ऑफ पाय मधील छोट्या 'पाय'ची भूहमका साकारणारा आयुष्य म्हणाला, इरफान सरांसोबत दोन चित्रपट केले. त्यात एक सात खून माफ आणि दुसरा ऑस्कर पुरस्कार विजेता 'लाईफ ऑफ पाय'. या दोन्ही चित्रपटाच्या त्यांच्याकडून मला काम कसे करायचे याच्या टिप्स तर मिळाल्याच, पण त्यांनी माझ्या सारख्या नवीन आणि बाल कलाकाराला खूप प्रोत्साहन दिलं. बाजीराव मस्तानीमधील माझे काम पाहून त्यांनी माझं कौतुकही केलं होते. अशा अभिनेत्याला विसरता येणार नाही.  

उद्धव ठाकरेंना द्यावा लागू शकतो राजीनामा, 172 आमदारांच्या पाठिंब्याने पुन्हा करणार सत्ता स्थापनेचा दावा?

मी लाईफ ऑफ पाय चित्रपटात त्यांच्या लहान पणाची भूमिका केली होती (लहान पाय) त्या भूमिकेचे होणारे कौतुक बघून त्यांनी मला सांगितले होते की मेहनत आणि निष्ठा ठेवून काम करत रहा खूप मोठा होशील. त्यांचे हे शेवटचे शब्द आजही माझ्या कानात घुमत आहेत. 

२०१९मध्ये उपचार करुन भारतात परतेला इरफान

लंडनवरुन उपचार करुन आल्यानंतर इरफान अंग्रेजी मिडीयम सिनेमाच्या शूटसाठी राजस्थानमध्ये गेला होता आणि त्याच्या पुढच्या शेड्युलसाठी लंडनला गेला आणि तिथे गेल्यानंतर तो डॉक्टरांच्या संपर्कात देखील होता.

कोरोनामुळे जग कोमात, मात्र ज्योतिषांचा धंदा जोमात; जोतिषांना लोकं विचारतायत....

मात्र लॉकडाऊन जाहीर करण्याच्या दोन दिवस आधीच सिनेमा रिलीज झाल्याने बॉक्स ऑफीसवर कमाई करु शकला नाही. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्याआधी इरफानने हा सिनेमा त्याच्यासाठी खूप खास असल्याचं म्हटलं होतं.

little pi of life of pi revealed his connection with late bollywood actor irfan khan

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: little pi of life of pi revealed his connection with late bollywood actor irfan khan