लॉकडाऊन आणि पावसानं केली अशी काही 'कमाल' की मुंबईकरांना अनुभवता येतंय स्वच्छंद जीवन, कसं ते वाचाच

mumbai
mumbai

मुंबई : सोमवारी रात्री झालेला पाऊस तसेच जोरदार वाऱ्यामुळे मुंबईतील सर्वात कमी प्रदूषणाची नोंद झाली. हवेतील प्रदूषण नोंदवण्यास 2015 च्या प्रारंभापासून सुरुवात झाली. तेव्हापासूनची सर्वोत्तम नोंदीची बरोबरी झाली. 
गतवर्षी म्हणजेच 4 सप्टेंबर 2019 या दिवशी हवेचा दर्जा निर्देशांक सर्वोत्तम नोंदला गेला होता. त्यावेळी निर्देशांक 12 होता. त्याची बरोबरी मंगळवारी साधली गेली. आता बुधवारी त्यात सुधारणा होऊन तो 10 असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

मंगळवारी मुंबईची हवा लंडन (21), टोकियो (52), सिडनी (25), सिंगापूर (25) यांच्यापेक्षा सरस होती. मात्र न्यूयॉर्कने (10) मुंबईस मागे टाकले होते. सफरमधील संशोधकांच्या मते हवेचा दर्जा सुधारण्यास अनेक कारणे निर्णायक ठरली आहेत. 

कोरोना महामारी रोखण्यासाठी लॉकडाऊन अमलात आला आहे. त्याचे दिर्घ परिणाम राहतात. सोमवारी रात्री तसेच मंगळवारी सकाळी झालेल्या पाऊस तसेच जोरदार वाऱ्याने प्रदूषण करणारे घटक जमिनीवरच राहिले. दरवर्षी पाऊस आल्यावर प्रदूषण कमी होतेच, पण यावेळी मार्चपासून असलेल्या लॉकडाऊनमुळे हवा स्वच्छ होण्यास मदत झाली आहे. आगामी काही दिवस पावसाचा अंदाज असल्याने हवा स्वच्छ राहील असा कयास तज्ज्ञांनी व्यक्त केला. 

मुंबई तसेच परिसरात असलेल्या दहाही ठिकाणी हवा चांगली असल्याची नोंद झाली. कुठेही ती तीसपेक्षा जास्त नव्हती. 0 ते 50 च्या दरम्यान नोंद झाल्यास ती चांगली मानली जाते. 51 ते 100 समाधानकारक, 101 ते 200 चांगली, 201 ते 300 खराब, 301 ते 400 वाईट आणि 400 पेक्षा जास्त असल्यास ते धोकादायक मानले जाते.

Lockdown and rain are some of the things that Mumbaikars can experience

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com