
Dilip Khedkar lookout notice
ESakal
ऐरोलीत झालेल्या किरकोळ अपघातातून पेटलेला वाद अखेर अपहरण, छळ आणि पुरावे नष्ट करण्याच्या कटापर्यंत पोहोचल्याने खेडकर कुटुंब मोठ्या अडचणीत आले आहे. या प्रकरणात दिलीप खेडकर, पत्नी मनोरमा खेडकर आणि अंगरक्षक प्रफुल्ल साळुंखे यांचा सहभाग उघड झाला आहे. धुळ्यातून साळुंखे याला अटक करण्यात आली असली तरी दिलीप आणि मनोरमा खेडकर अद्याप फरार आहेत. खेडकर दाम्पत्य परदेशात पळून जाऊ नये, यासाठी नवी मुंबई पोलिसांनी त्यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली आहे.