esakal | रा.. रा.. रा... 'झूम'ला टक्कर देण्यासाठी येतंय १०० टक्के भारतीय 'से नमस्ते' ऍप, जाणून घ्या फीचर्स...
sakal

बोलून बातमी शोधा

रा.. रा.. रा... 'झूम'ला टक्कर देण्यासाठी येतंय १०० टक्के भारतीय 'से नमस्ते' ऍप, जाणून घ्या फीचर्स...

हे ऍप्लिकेशन वापरताना तुम्हाला तुमच्या मोबाईलचा मागचा किंवा पुढचा कोणताही कॅमेरा वापरता येणार आहे, तशी सुविधा या ऍपमध्ये देण्यात आली आहे.

रा.. रा.. रा... 'झूम'ला टक्कर देण्यासाठी येतंय १०० टक्के भारतीय 'से नमस्ते' ऍप, जाणून घ्या फीचर्स...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - सध्या आपण लॉक डाऊनमध्ये आहोत. अशात अनेक जण घरातून काम करतायत. ऑफिस मिटिंगसाठी अनके कंपन्यांकडून त्याचसोबत अनेक शैक्षणिक संस्था किंवा कोचिंग क्लासेसकडून देखील झूम या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग ऍप्लिकेशनचा वापर करण्यात येतोय. मात्र या ऍप्लिकेशनच्या सेक्युरिटीबद्दल अनके प्रश्न उपस्थित केले गेलेत. 'झूम'मधून व्हिडीओ कॉन्फरन्सिंग डेटा लीक झाल्याच्या अनेक घटना समोर आल्यात. यानंतर भारतात देखील सरकारकडून अधिकृत बैठकांसाठी झूम वापरणार नसल्याचं स्पष्ट केलं गेलं.

जगभरातून झूम ऍपला आता वाळीत टाकण्यात येतंय. झूम वापरताना तुमच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये ज्यांना निमंत्रण नाही अशी व्यक्ती देखील जॉईन होऊ शकते, याची कल्पना होस्टला देखील नसते. अशात हॅकिंगसाठी स्क्रिन रेकॉर्ड करून किंवा तुमचा खासगी डेटा डार्क वेबवर विकण्यात येतो. याच पार्श्वभूमीवर आता एक मेड इन इंडिया ऍप्लिकेशन आता आकार घेतंय. या ऍप्लिकेशनचं नाव आहे ' से नमस्ते'.  

वाईन शॉप्स सुरु करा; राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंकडे मागणी...

'से नमस्ते' हे ऍप सध्या बीटा व्हर्जन म्हणजेच टेस्टिंग व्हर्जनमध्ये आहेत. हे ऍप्लिकेशन मोबाईल आणि डेस्कटॉप दोघांवरून वापरता येणार आहे. अश्या या ऍप्लिकेशनला प्रचंड मागणी असल्याने आणि हे ऍप्लिकेशन बीटा व्हर्जनमध्ये असल्याने या 'ऍप'च्या साईटवर "We are facing tremendous demand for NAMASTE and hence you may face some temporary connectivity issues. Please check back soon" म्हणजेच काही तांत्रिक कारणामुळे तुम्हाला हे ऍप्लिकेशन वापरण्यास त्रास होतोय, कृपया थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा असा संदेश दिसतोय. 

या भारतीय ऍप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही झूम सारख्या व्हिडीओ मिटिंग होस्ट करू शकतात. मात्र यामध्ये एकाच वेळी कितीजण एकत्रित व्हिडीओ कॉन्फरन्सिंग करू शकतात याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.   

लॉकडाऊनचा कंटाळा आला म्हणून १५ कोटींच्या कंपनीचा मालक बनला डिलेव्हरी बॉय

काय आहेत या ऍप्लिकेशनचे फीचर्स : 

  • हे ऍप्लिकेशन वापरताना तुम्हाला तुमच्या मोबाईलचा मागचा किंवा पुढचा कोणताही कॅमेरा वापरता येणार आहे, तशी सुविधा या ऍपमध्ये देण्यात आली आहे.
  • या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला केवळ ऑडियो कॉन्फरन्सिंग करायचं असेल तर तो देखील ऑप्शन उपलब्ध आहे. 
  • एकाच वेळी किती जणांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंग करता येईल हे अद्याप गुलदस्त्यात आहे. 

मुंबईतील 'इनस्क्रिप्ट' नामक एका वेब ऍप्लिकेशन आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करणाऱ्या कंपनीने हे ऍप बनवलंय. येत्या आठवड्यात हे ऍप्लिकेशन अँड्रॉईड आणि आयओएस साठी लॉन्च करण्यात येणार असल्याचं बोललं जातंय.  

एकीकडे लॉक डाऊन तर दुरीकडे भारत-पाकिस्तानात समुद्रात युद्ध ? काय आहे सत्य/असत्य

कसं वापराल नमस्ते ऍप्लिकेशन 

  • "Create new meeting" ऑप्शन वापरून तुम्ही मिटिंग तयार करू शकतात. 
  • ई-मेल किंवा कॉन्टॅक्टच्या माध्यमातून मीटिंगमध्ये सहभागी होणाऱ्यांची नाव ऍड करू शकतात. 
  • यानंतर,  तुम्हाला मिटिंग URL, मिटिंग ID आणि मिटिंग कोड मिळेल 
  • कॉपी पेस्ट करून तुम्ही मिटिंग आयडी किंवा मिटिंग URL शेअर करू शकतात, या माध्यमातून इतर लोकं मिटिंग जॉईन करू शकतील. 

दरम्यान हे ऍप्लिकेशन सध्या टेस्टिंग आणि बीटा व्हर्जनमध्ये असल्याने याच्या सेक्युरिटीबाबत काही माहिती समोर आलेली नाही. हे ऍप्लिकेशन झूमपेक्षा जास्त सेफ आहे की नाही याबद्दल अद्याप माहिती नाही. 

made in mumbai say namaste app is launching to give competition to zoom app

loading image