esakal | मुख्यमंत्री विरोधकांवर कडाडले, तिनचाकी कार नाही पण...
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्यमंत्री विरोधकांवर कडाडले, तिनचाकी कार नाही पण...

तिनचाकी कार नाही पण सरकार चालवतो, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विरोधकांवर टिका, रस्ता सुरक्षा अभियांनाच्या उद्घाटनाप्रसंगी ठाकरे यांचे उद्गार 

मुख्यमंत्री विरोधकांवर कडाडले, तिनचाकी कार नाही पण...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई - दुचाकी चालवण्याची सवय नाही. पण सध्या तिनचाकी कार नसली तरी सरकार चालवतो. त्याच्यामध्ये रहदारीचे नियम पाळतो. महाआघाडीवर तिनचाकी सरकार म्हणून टिका झाली, मात्र तिन चाकी असलं तरी चालतयं ना हे महत्वाचे. बॅलन्स जमलं पाहिजे. दोन चाकी असो किंवा तिन, चार चाकी असले तरी आपटायचे ते आपटलेच आहे. अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणविस यांच्यावर टिका केली. ते यावेळी राज्यातील 31 व्या रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते. 

मोठी बातमी -  संजय राऊत म्हणतात 'आमचं थोडं मिस कम्युनिकेशन झालं'

नरिमन पॉईंन्ट येथील जमशेद भाभा थिएटर येथे परिवहन विभाग, अपर पोलीस महासंचालक (वाहतूक), राज्य व मुंबई पोलीस वाहतूक विभाग, यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (ता.13) रोजी उद्धाटन पार पडले, यावेळी परिवहन मंत्री अनिल परब, राज्यमंत्री सतेज पाटील यांची प्रमूख उपस्थिती होती. दोन असो किंवा तिन, चार चाकी वाहन असो, त्या वाहनाचे चार ज्याच्या हाती आहे ते चाक महत्वाच असते. त्यामूळे त्याला हे नियम शिकवनं अत्यंत आवश्‍यक आहे. त्याशिवाय राज्यातील अपघात कमी करण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी मदत करणार असून, इतर राज्य आणि देशाच्या तुलनेत राज्यातील अपघाताची संख्या कमी करा, तर रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान एक आठवडा न पाळता वर्षभर दक्ष राहून शून्य टक्के अपघाताकडे लक्ष देऊन सुरक्षित महाराष्ट्र घडवूया, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मोठी बातमी -  ठाकरे सरकार न्याय मिळवून देणार का ?

आधुनिक तंत्रज्ञानामुळे रस्त्यावर वाहतूक पोलीस जरी दिसत नसले तरी पोलीसांचे लक्ष आपल्यावर असते. 2005 मध्ये चीनमधील प्राणांतिक अपघातांचे प्रमाण 94 हजार आणि भारताचे 98 हजार होते. आता चीन 45 हजारांवर तर भारतामधील मृत्युदर दीड लाखांवर आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी आपली सुरक्षा ही कुटुंबांची सुरक्षा समजून शून्य टक्के अपघाताचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे आणि सुरक्षित महाराष्ट्र घडवावा, असे आवाहन ठाकरे यांनी यावेळी केले. 

यावेळी परिवहन सचिव आशिषकुमार सिंह, परिवहन आयुक्त शेखर चन्ने, बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ.सुरेंद्र कुमार बागडे, एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजीतसिंह देओल आणि परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकारी, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. 

जाणून घ्या -  'लव्ह रूम' बद्दल ऐकलंय का ?

जाणून घ्या - मुंबईत ९० रुपयात विकला जातोय मृत्यू

2018 च्या तुलनेत 2019 मध्ये राज्यातील अपघातांच्या संख्येत 8 टक्‍यांनी घट झाली आहे.चालु वर्षात अपघातांची संख्या 15 टक्‍यांनी कमी करण्याचे उदिष्ट परिवहन विभागाचे आहे. राज्यातील 22 चेक पोस्टवर वाहन चालकांच्या आरोग्याची आणि नेत्र तपासणी केली जाते. तर 1324 ब्लॅकस्पॉट असून त्यावर उपाययोजना सुरु आहेत. 
- शेखर चन्ने, परिवहन आयुक्त 

राज्यात 12 हजार नागरिक अपघातांमध्ये मुत्युमुखी पडतात ही चिंतेची बाब आहे. त्यामूळे रस्ता सुरक्षा मर्यादीत न राहता संपुर्ण वर्ष रस्ता सुरक्षा अभियान राबवले पाहिजे. जेणे करून 10 टक्के तरी अपघाताचे प्रमाण कमी करता येईल 
- अनिल परब, परिवहन मंत्री 

मोठी बातमी - लग्नापूर्वीचं छायाचित्रण करायचंय! नवी मुंबईतील ही ठिकाणं आहेत 'बेस्ट'

नगर विकास विभागाकडून विकास नियंत्रण नियमावली तयार करताना परिवहन विभागाशी चर्चा करूनच विकास आराखडा तयार करावा. त्यामूळे ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुर्वनियोजीत उपाययोजना केल्या जाईल. त्यासाठी राज्य सरकारने विशेष निधीची तरतुद सुद्धा करावी 
- सतेज पाटील, परिवहन राज्यमंत्री 

maharashtra CM uddhav thackeray targets BJP over taunts about fiture of mahavikas aaghadi