esakal | म्हणून अर्थसंकल्पावेळी अजित पवारांनी केलं नितीन गडकरींचं तोंड भरून कौतुक...
sakal

बोलून बातमी शोधा

म्हणून अर्थसंकल्पावेळी अजित पवारांनी केलं नितीन गडकरींचं तोंड भरून कौतुक...

म्हणून अर्थसंकल्पावेळी अजित पवारांनी केलं नितीन गडकरींचं तोंड भरून कौतुक...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : आज महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत मांडण्यात आला. ठाकरे सरकारच्या नेतृत्वात महाविकास आघाडीकडून हा पहिलाच अर्थसंकल्प मांडण्यात आला. यात शेतकरी कर्जमाफी, तरुणांचा रोजगार, क्रीडा, पर्यटन, रस्तेविकास इत्यादी प्रकारच्या मुद्द्यांवर या अर्थसंकल्पात योजना मांडण्यात आल्या. दरम्यान अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडताना केंद्र सरकारवर चांगलीच टीका केली. ही टीका करत असताना अर्थमंत्री अजित पवार यांनी भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मात्र आभार मानलेत.  

#MahaBudget2020 : अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पातील A टु Z मुद्दे....

अजित पवारांकडून गडकरींचं कौतुक:

बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाला ८५०० कोटी देण्यात येणार आहेत. तसंच या मार्गावर ४० कृषी समृद्धी केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. तसंच नागरी सडक योजनेसाठी २७०० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. नितीन गडकरींनी रस्ते बांधकामासाठी १२०० कोटी केंद्रीय फंडातून देण्याचं कबूल केलं आहे. तसंच दोन पदरी आणि चार पदरी रस्त्यांच्या बांधकामासाठी नितीन गडकरींनी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे अजित पवारांनी गडकरींचं तोंड भरून कौतुक केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरींची यासंदर्भात भेट घेतली  होती. उद्धव ठाकरे यांचे सर्व प्रस्ताव नितीन गडकरींनी मान्य केल्यामुळे सभागृहात अजित पवारांनी गडकरींचं कौतुक केलयं.

#MahaBudget2020  राज्यात पट्रोल-डिझेल महागणार; मुंबई, पुण्यात घरखरेदी स्वस्त 

या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या योजना मांडण्यात आल्या. "शेतकऱ्यांसमोर अतिवृष्टीमुळे आणि महापुरामुळे प्रश्न निर्माण झाले असतानाही केंद्र सरकारनं शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष दिलं नाही. कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांमध्ये महापूर आला तेव्हा राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे १४०० कोटींची मागणी केली होती मात्र केंद्र सरकारनं फक्त ७०० कोटींची मदत केली. तसंच राज्यसरकारला GST परतव्यातून मिळणाऱ्या एकूण निधीमध्ये केंद्र सरकारनं ८००० कोटी कमी दिले. " अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारवर केलीये.

maharashtra finance minister ajit pawar praises central minister nitin gadakari