

Mumbai-Thane Metro
ESakal
मुंबई : मुंबई आणि ठाणे दरम्यान सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. सरकारने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला ₹५०० कोटींचे व्याजमुक्त कर्ज मंजूर केले आहे. या निधीमुळे अनेक प्रलंबित मेट्रो मार्गांचे काम जलद गतीने पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये सर्वात महत्त्वाची म्हणजे मुंबई-ठाणे मेट्रो मार्गाचा समावेश आहे. या प्रकल्पाबद्दल रहिवासी उत्सुक आहेत. कारण यामुळे उपनगरांना कनेक्टिव्हिटी मिळेल.