Crime : पुण्यात अंधश्रद्धेचा कळस; सुनेला काळे कपडे घालण्यास विरोध; गुन्हा दाखल

शिक्षणाचे माहेर घर असलेल्या पुण्यामध्ये अंधश्रद्धेचा कळस दाखवणारी घटना समोर आली आहे.
Superstition
Superstitione sakal

शिक्षणाचे माहेर घर असलेल्या पुण्यामध्ये अंधश्रद्धेचा कळस दाखवणारी घटना समोर आली आहे. उच्चशिक्षित सुनेसोबत सासरच्या मंडळींनी हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे. मुल होत नसल्याचा बहाणा देत सुनेला सासरच्या मंडळींकडून काळे कपडे घालण्यास विरोध करण्यात आला. या प्रकरणी पुणे पोलिसांकडून सासरच्यांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Superstition
Shivsena : शंभर आचारी रस्सा भिकारी म्हणत शिवसेनेची विरोधकांना साद

याबाबत अधिक माहिती अशी की, ही घटना पुण्यातील लोणी काळभर परिसरातील असून, पीडित सून पुण्यातील एका नामांकित आयटी कंपनीत कामाला आहे. संबंधित महिलेला गेल्या काही दिवसांपासून सासू, सासरे आणि पतीकडून सातत्याने त्रास दिला जात असल्याचेही सांगितले जात आहे. एवढेच नव्हे तर, मूल होत नसल्याने तु काळे कपडे परिधान करायचे नाही असेदेखील या महिलेला वारंवार सांगितले जात होते. तसेच तु काळे कपडे घातलेस तर तुला मूल होणार नाही असेदेखील वारंवार अंधश्रद्धेच्या नावाखाली सांगितले जात होते.

Superstition
Hazratganj Accident : घराची भिंत कोसळून दोन मुलांसह 9 ठार

काळे कपडे घालण्यास मज्जाव करण्याबरोबरच सुनेला एका देवीच्या ठिकाणाहून आणलेले कुंकू दररोज लावण्यास सक्ती केली जात होती. तसेच ते न लावल्यास तुला काही तरी होईल अशी भीती दाखवली जात होती. याशिवाय पतीकडून देखील या महिलेला सातत्याने अश्लील व्हिडिओ दाखवले जात होते. त्याशिविया तुझ्या घरच्यांकडून चांदीच्या वस्तू गेऊन ये नाही असे न केल्यास तुला मूल होणार नाही असे सांगितले जात होते.

Superstition
सुनील गावसकराचं मुख्यमंत्र्यांसह जितेंद्र आव्हाडांना पत्र; घेतला मोठा निर्णय...

हा सर्वप्रकार असाह्य झाल्यानंतर अखेर संबंधित सुनेनं घरच्यांना सर्व प्रकार सांगितला त्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी सासू, सासरे आणि पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शिक्षणाचे माहेर घर असेलेल्या पुण्यासारख्या शहरात असा धक्कादायक प्रकार समोर आल्यामुळे सर्वच स्तरातून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com