esakal | युती तुटल्यानंतरही शिवसेना म्हणते, 'मु्ख्यमंत्री आमचाच'
sakal

बोलून बातमी शोधा

maharashtra political updates shiv sena firm on cm position sanjay raut

राज्यात सत्ताही स्थापन करणार नाही, शिवसेनेला अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्री करण्याचा दिलेला शब्दही पाळणार नाही, असं कसं चालेल : संजय राऊत

युती तुटल्यानंतरही शिवसेना म्हणते, 'मु्ख्यमंत्री आमचाच'

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई : एका बाजुला भाजपने सत्ता स्थापन करणार नसल्याचे स्पष्ट करून शिवसेनेला शुभेच्छा दिल्या असताना, राज्यात मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असा दावा शिवसेनेने केला आहे. शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी याबाबत मीडियाशी बोलताना स्पष्टीकरण दिले.

भाजप सत्ता स्थापन करणार नाही : चंद्रकांत पाटील

भाजपची काय भूमिका?
राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी सिंगल लार्जेस्ट पार्टी भाजपला आमंत्रण दिलं असलं तरी, आमचा युतीतील मित्रपक्ष शिवसेना सोबत नसल्यामुळं आमच्याकडं पुरेसं संख्याबळ नाही. त्यामुळं आम्ही सत्ता स्थापन करू शकत नाही, असं आज भाजपनं स्पष्ट केलंय. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही भूमिका जाहीर केली. त्यानंतर शिवसेना प्रवक्त संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

शिवसेना-राष्ट्रवादी सरकार स्थापन करणार; काँग्रेसची अपेक्षा काय?

शिवसेनेची काय भूमिका?
राऊत म्हणाले, 'जर, भाजपने सत्ता स्थापन न करण्याचा निर्णय घेतला असले तर, त्यांचा मुख्यमंत्री कसा होईल. त्यांनी सातत्याने सत्ता भाजपचीच येईल, मुख्यमंत्री भाजपचाच होईल, असे जाहीर केले होते. पण, ते सत्ताच स्थापन करणार नाही, असं आता म्हणत आहेत. राज्यात सत्ताही स्थापन करणार नाही, शिवसेनेला अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्री करण्याचा दिलेला शब्दही पाळणार नाही, असं कसं चालेल.' शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार का? यावर राऊत म्हणाले, 'आज दुपारी झालेल्या आमदारांच्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल.'