CM शिंदेच्या ठाण्याजवळ रस्त्याअभावी रुग्णांचे हाल, पावसात 4 किमीची पायपीट

Mokhada Tribal
Mokhada TribalSakal Digital

मोखाडा : मोखाड्यातील मरकटवाडी पाडा... ७ जुलैला सकाळी गावातील सुंदर किरकिरे या महिलेची प्रकृती खालावली... बाहेर धो धो पाऊस आणि गावातून बाहेर जाण्यासाठी रस्ता नाही.. आता सुंदर यांना रुग्णालयात न्यायचे तरी कसे हा प्रश्नच होता. शेवटी गावातील गावातील चार तरुणांनी प्लास्टिक आणि कापडाची डोली तयार केली. भरपावसात चार किलोमीटर पायपीट करत या तरुणांनी सुंदर यांना मुख्यरस्त्यापर्यंत आणले आणि तिथून वाहनाने सुंदर यांना खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून ठाण्यापासून मोखाडा हे अंतर १४० किमी आहे. ठाण्याचे एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्री झाले असून आता तरी मुंबई, ठाण्यालगतच्या या आदिवासी पाड्यात प्राथमिक सुविधा उपलब्ध होतील का, असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत. (Palghar News)

Mokhada Tribal
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीसांची Property किती आहे माहितीय?

मोखाडा तालुक्यातील अतिदुर्गम बोटोशी ग्रामपंचायती मधील मरकटवाडी येथेही जायला रस्ता नाही. केवळ 4 किलोमीटरची पायवाट आहे. 50 घरे आणि 250 आदिवासी लोकवस्तीची ही वाडी स्वातंत्र्यपूर्व काळापासून वसलेली आहे. येथे अंगणवाडी व प्राथमिक शाळा आहे. या वाडीत अंगणवाडी सेविका मदतनीस सुंदर जयराम किरकिरे (35) या आदिवासी महिलेला मंगळवारी 5 जुलैला रात्री ढाळवांतीचा त्रास होऊ लागला. तेथे काहीच सुविधा नसल्याने हा त्रास अधिकच बळावला आणि त्या अत्यवस्थ होऊ लागली. अखेर बुधवारी 6 जुलैला सकाळी साडेसातच्या सुमारास येथील गोविंद वाघ, जयराम किरकिरे, हनुमंत वाघ, विलास वाघ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्लास्टिक आणि कापडाची डोली करून मुसळधार पावसात 4 किलोमीटर पायपीट करत सुंदर यांना बेलपाडा येथे मुख्य रस्त्यापर्यंत आणले. (Tribal Communities in Mokhada Taluka)

Mokhada Tribal
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच आनंद दिघेंच्या पुतण्याने केली मोठी मागणी

आशा कार्यकर्ती मंदा वाघ यांनी पाथर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते तुकाराम पवार यांना फोन करून घटना सांगितली. पवार यांनी तातडीने येथे त्यांना खासगी जीप उपलब्ध करून दिली. तेथून सुंदर यांना तातडीने खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात ऊपचारासाठी दाखल करण्यात आले. दवाखान्यात तातडीने ऊपचार केल्याने सुंदर या मृत्यूच्या दाढेतून परतल्या आहेत. त्यांची तब्येत ठिक असल्याचे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. तालुक्यात अनेक गाव, खेडे पाड्यांना अजूनही प्राथमिक सुविधा पोहोचलेल्या नाही.त त्यामुळे स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही येथील आदिवासी मरण यातना भोगत असल्याचे या घटनांमुळे समोर आले आहे. (No roads tribals carry woman in stretcher for 4 km)

अनेकदा पाठपुरावा करूनही रस्ता नाही

मरकटवाडी येथे जाण्यासाठी रस्ता तयार करावा यासाठी माजी सरपंच जिजाबाई पवार आणि उपसरपंच त्र्यंबक मालक यांनी अनेकदा कागदोपत्री पाठपुरावा केला. आंदोलन देखील केले. मात्र, अजूनही प्रशासकीय यंत्रणेला जाग आलेली नाही. तसेच लोकप्रतिनिधींनी ही याबाबीकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे येथील आदिवासींना हाल अपेष्टा भोगाव्या लागत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते तुकाराम पवार यांनी सांगितले आहे.

आठवड्याभरातील दुसरी घटना

काही दिवसांपूर्वी तालुक्यातील बोटोशी गावठाणात जायला रस्ता नसल्याने कित्येक तास सीता दिवे या गर्भवती महिलेने प्रसुती वेदना सहन केल्या. येथे ग्रामस्थांनी श्रमदानाने रस्ता केला. रुग्णवाहिका चालकाने प्रसंगावधान राखून तीला दवाखान्यात दाखल केले. या घटनेचे सर्वच स्तरातून कौतुक झाले. मात्र, रस्त्यांचा आणि प्राथमिक सुविधांचा मुळप्रश्न तसाच दुर्लक्षित राहिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com