esakal | #KheloIndia : ठाण्यातील जिम्नॅस्टनी केली राज्याची सुवर्ण सुरूवात
sakal

बोलून बातमी शोधा

 #KheloIndia : ठाण्यातील जिम्नॅस्टनी केली राज्याची सुवर्ण सुरूवात

#KheloIndia : ठाण्यातील जिम्नॅस्टनी केली राज्याची सुवर्ण सुरूवात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ठाण्यात मार्गदर्शन घेत असलेल्या अस्मी बडदे आणि मानस मनकवले यांनी खेलो इंडियातील महाराष्ट्राची पहिली दोन सुवर्णपदके जिंकण्याची कामगिरी केली. 

ठाण्यात पूजा आणि मानसी सुर्वे यांच्याकडे रिदमीक प्रकारातील सुवर्णपदक विजेती अस्मी तसेच रौप्यपदक जिंकलेली श्रेया बंगाळे मार्गदर्शन घेतात. सतरा वर्षाखालील गटात अस्मीने 43.80 तर श्रेयाने 40.80 गुण मिळवले. ज्ञानसाधना विद्यामंदीरात शिकणाऱ्या अस्मीने खेलो इंडिया पदार्पणात सुवर्णपदक जिंकले. राष्ट्रीय स्पर्धेत पाच सुवर्णपदक जिंकलेल्या अस्मीने गतस्पर्धेतील विजेत्या श्रेयास मागे टाकले. 

ईडीची कारवाई चंदा कोचर यांच्या 78 कोटीच्या संपत्तीवर टाच

मानसने 17 वर्षाखालील गटात पॉमेल हॉर्स प्रकारात सुवर्णपदक जिंकले. ठाण्यातील सरस्वती क्रीडा संकुलात महेंद्र बाभुळकर यांचे मार्गदर्शन लाभलेल्या मानसची ही पहिलीच स्पर्धा आहे. त्याने 10.65 गुणांसह अव्वल क्रमांक मिळवला. 

आरटीओच्या बारामती पॅटर्नला राज्यभरात खीळ?

औरंगाबादच्या सिद्धा हात्तेकर हीने स्पर्धेतील दुसरे रौप्यपदक जिंकले. तिने टेबल व्हॉल्ट प्रकारात ही कामगिरी केली. याचबरोबर मेघ रॉय (फ्लोअर एक्‍झरसाईज), सलोनी दादरकर (अनइव्हन बार्स), इशिता रेवाळे (बॅलन्सींग बीम) यांनी ब्रॉंझ पटकावले. 

व्हॉलिबॉलमध्ये पराभव 
व्हॉलिबॉलमध्ये महाराष्ट्राच्या 21 वर्षाखालील मुलींच्या संघास साखळीतील लढतीत हार पत्करावी लागली. केरळने त्यांचा 25-21, 25-13, 25-8 असा पराभव केला. पहिल्या सेटमध्ये महाराष्ट्राने माफक लढत दिली, पण त्यानंतर महाराष्ट्राचा बचाव नि:ष्प्रभ ठरला. 

असा करा हुकूमशाहीचा सामना, वाचा शरद पवार काय म्हणाले


हरियानाच्या चक्रव्यूहात महाराष्ट्र फसले 
मुंबई ः खेलो इंडिया कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या चक्रव्यूहात महाराष्ट्र फसले. सुरुवातीलाच लोण स्वीकारलेल्या सतरा वर्षाखालील कबड्डी संघास 16-44 पराभवास सामोरे जावे लागले. आक्रमक चढायांनी बचाव खिळखिळा झाला आणि चढाईपटूंची कोंडी झाली, हे चक्रव्यूह महाराष्ट्राला भेदताच आले नाही. राज्याच्या 21 वर्षाखालील संघाने आसामला 43-12 असे हरवले खरे, पण केवळ यजमान असल्यामुळेच आसामचा संघ या स्पर्धेत खेळत आहे. इशान्य भारतातील कबड्डी खेळणारा खेलो इंडियातील आसाम हा पहिला संघ ठरला, त्या परिस्थितीत आव्हान फारसे असणारच नव्हते. मात्र या सामन्यातही महाराष्ट्राच्या मर्यादा दिसल्या. मोठ्या आघाडीनंतर राखीव खेळाडूंना संधी देण्यात आली, पण त्यांची छाप पडली नाही.