esakal | मोठी बातमी : महाविकास आघाडीच्या संभाव्य मंत्र्यांची नावे आली समोर
sakal

बोलून बातमी शोधा

मोठी बातमी : महाविकास आघाडीच्या संभाव्य मंत्र्यांची नावे आली समोर

मोठी बातमी : महाविकास आघाडीच्या संभाव्य मंत्र्यांची नावे आली समोर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालंय. मात्र सध्या राज्यात फक्त सहा मंत्री सर्व खात्यांचा कारभार सांभाळतायत. सत्ता स्थापनेनंतर तब्बल एक महिना उलटला तरीही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. अशात आता येत्या 30 तारखेला म्हणजेच सोमवारी मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त लागणार आहे. मुंबईत विधान भवनाच्या प्रांगणात महाविकास आघाडीचे मंत्री शपथ घेणार आहेत. 

महाविकास आघाडीचा 13-12-12 चा खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरलाय. महाराष्ट्रात जास्तीत जास्त 43 मंत्री शपथ घेऊ शकतात. अशात सहा मंत्र्यांनी या आधीच शपथ घेतली आहे त्यामुळे 30 तारखेला होऊ घातलेल्या मंत्रिमंडळ विस्तारत 30 ते 35 आमदार मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जातेय.  

30 तारखेला होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात कोण कोणते आमदार शपथ घेणार आहेत हे अद्याप अधिकृतरित्या समोर आलेलं नाही. मात्र काही आमदारांची नावं संभाव्य मंत्री म्हणून पुढे येताना पाहायला मिळतायत.  


हे माहितीये का ? : महिला जास्त खोटं बोलतात की पुरुष, आता मिळालं उत्तर..
    

महाविकास आघाडीच्या संभाव्य मंत्र्यांची नावे  

शिवसेना

 • गुलाबराव पाटील, शिवसेना - जळगाव 
 • अब्दुल सत्तार - सिल्लोड   
 • दादा भुसे, शिवसेना - मनमाड 
 • संजय रायमूलकर, शिवसेना - बुलडाणा 
 • बच्चू कडू (प्रहार), शिवसेना - मरावती 
 • राहुल पाटील, शिवसेना - परभणी  
 • प्रदीप जयस्वाल, संजय शिरसाट - औरंगाबाद 
 • श्रीनिवास वनगा, शिवसेना - पालघर 
 • रवींद्र वायकर/ सुनील राऊत(शिवसेना) - मुंबई 
 • तानाजी सावंत, शिवसेना - उस्मानाबाद 
 • शंभूराज देसाई, शिवसेना - सातारा 
 • भास्कर जाधव, शिवसेना - कोकण  
 • दीपक केसरकर, शिवसेना - तळ कोकण  
 • प्रकाश अबीटकर, शिवसेना - कोल्हापूर  
 • आशिष जयस्वाल, शिवसेना - नागपूर  
 • संजय राठोड, शिवसेना - यवतमाळ

मोठी बातमी :  'वर्षा'वरील रेघोट्यांवर संजय राऊत याचं उत्तर, म्हणालेत...

राष्ट्रवादी काँग्रेस

 • अजित पवार, राष्ट्रवादी - बारामती  
 • अनिल गोटे, राष्ट्रवादी - जळगाव 
 • धर्मराव बाबा आत्राम, राष्ट्रवादी - विदर्भ 
 • राजेश टोपे, राष्ट्रवादी - जालना  
 • नवाब मलिक , राष्ट्रवादी - मुंबई 
 • संग्राम जगताप, राष्ट्रवादी - अहमदनगर  
 • हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी - कोल्हापूर  
 • अनिल देशमुख, राष्ट्रवादी - नागपूर  
 • इंद्रनिल नाईक, राष्ट्रवादी - यवतमाळ  
 • राजू शेट्टी/जयंत पाटील(शेकाप) कोल्हापूर / अलिबाग 

मोठी बातमी : स्वतःच जेट विमान असणाऱ्या माधुरीने विकला 'तो' बंगला

काँग्रेस

 • के सी पाढवी, काँग्रेस - उत्तर महाराष्ट्र   
 • अमित झनक, काँग्रेस - मालेगाव 
 • यशोमती ठाकूर, काँग्रेस - विदर्भ  
 • अशोक चव्हाण, काँग्रेस - मराठवाडा  
 • अमीन पटेल, काँग्रेस - मुंबई  
 • अमित देशमुख, कोंग्रेस - लातूर  
 • प्रणिती शिंदे, काँग्रेस - सोलपूर  
 • सतेज पाटील, काँग्रेस - कोल्हापूर  
 • विश्वजीत कदम, काँग्रेस - सांगली   
 • जोगेंद्र कवाडे (मित्रपक्ष) - मुंबई 

मोठी बातमी : मुंबईकरांनो मटन खाताय? जरा थांबा, कारण..

mahavikas aaghadis potential candidate for maharashtra cabinet expansion