DIWALI 2020 : दिवाळी अंकांवर कोरोना संकटाचा भयंकर परिणाम, यंदा १०० अंक आलेच नाहीत

मिलिंद तांबे
Thursday, 12 November 2020

दिवाळी अंकांमध्ये 'सामाजिक अंतर', 'कोरोना नंतरचे जग', 'कोरोना मधील आरोग्याची काळजी', 'लॉकडाऊन' यांसारखे विषय अधिक दिसतात.

मुंबई : दिवाळी अंकांवर कोरोना संकटाचा विपरीत परिणाम झाल्याचे दिसते. टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर यंदा दिवाळी अंकांच्या निर्मितीवर थेट परिणाम झाला असून सरासरीपेक्षा 100 अंक बाजारात कमी आले आहेत. मात्र तरीही ही परंपरा जपणारे महत्वाचे  दिवाळी अंक बाजारात दाखल झाले असून वाचकांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

आयडीयल बूक डेपोचे मंदार नेरूळकर यांनी सांगितले की, दरवर्षी साधारणतः 350 पेक्षा अधिक दिवाळी अंक बाजारात येत आसतात. यंदा मात्र हा आकडा 250 वर आला आहे. जाहीराती कमी झाल्याने काही दिवाळी अंकांना फटका बसल्याचे नेरूळकर यांचे म्हणणे आहे. यंदा दिवाळी अंकांच्या जाहिराती सुमारे 35 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत.

महत्त्वाची बातमी : छटपुजेसाठी महानगर पालिकेकडून दोन दिवसात येणार नियमावली

दिवाळी अंकांना हक्काच्या जाहिराती देणाऱ्या अनेक बँकांनीही आखडता हात घेतला आहे. त्याचा फटका दिवाळी अंकांना बसला. यंदा सरकारी जाहीराती अनेक अंकांमध्ये असल्याने काहीसा दिलासा मिळाला. मात्र असे असले तरी  दिवाळी अंकांची परंपरा कायम ठेवणारे अनेक अंक अगदी वेळेत बाजारात दाखल झाल्याचे ही त्यांनी सांगितले.

दसऱ्यानंतर दिवाळी अंकांना मागणी वाढली आहे. वाचक हळुहळू ऑनलाइन मागणीकडे वळत असल्याचे ही त्यांनी नमूद केले. कॉर्पोरेट, बँका, गृहनिर्माण इमारती यांच्याकडून पूर्वीइतकी दिवाळी अंकांची मागणी नसली, तरी वैयक्तिक वाचक मात्र दिवाळी अंक विकत घेऊन वाचताना दिसतो. अनेक वाचक दिवाळी अंक विकत घेण्याची परंपरा जोपासतात, त्यामुळे कोरोना काळातही दिवाळी अंकांना सुगीचे दिवस असल्याचे ही नेरूळकर म्हणाले.

महत्त्वाची बातमी : पालिकेने केलं शुल्क माफ, मात्र पार्किंग ठेकेदारांकडून वाहन चालकांची पाकीटमारी सुरूच

मॅजेस्टीक प्रकाशन तसेच बूक डेपोचे अशोक कोठावले यांनीन आपला अनुभव कथन करतांना सांगितले की, दिवाळी अंकांच्या कमाला साधारणतः जूनमध्ये सुरूवात होते. यावेळी मात्र कोविड मुळे साशंकता होती. तरी देखील काम सुरू केले. दिवाळी अंकांना प्रतिसाद मिळेल न मिळेल असा विचार करून आवृत्ती कमी छापण्याचा निर्णय घेतला. कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षात  कार्यालयात येणे शक्य नसल्याने अंकांचे सर्व काम ऑनलाईन केले. काम वेळेच्या आधी पुर्ण केले. दरवर्षी आम्ही दिवाळीच्या 4 दिवस आधी अंक बाजारात आणतो, यावेळी मात्र एक आठवडा आधी अंक बाजारात आणला. अंक विकला जाईल की नाही याबाबत साशांकता होती. मात्र दिवाळी अंकांना चांगली मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोनामुळे दिवाळी अंकांती विक्री 50 टक्क्यांवर येईल अशी अपेक्षा होती. मात्र प्रतिसाद चांगला मिळाल्याने विक्री 80 टक्क्यांवर पोचल्याचे ही अशोक कोठावले यांनी सांगितले. ऑनलाईन बूकींग तिपटीने वाढली असून आता ही बूकींग जोरात सुरू आहे. दिवाळी अंकांच्या किंमती कमी करायला लागतील असे आम्हाला सुरूवातीला वाटत होते. मात्र वाचकांची वाढती मागणी पाहून अंकांची किंमत स्थिर आहे. तर अंकांची पाने वाढली असून 224 पानांचा दिपावली अंक 260 तर 204 पानांचा ललित अंक 228 पानी झाला असल्याचे ही कोठावले यांनी सांगितले.\

महत्त्वाची बातमी : अण्णासाहेब पाटील महामंडळाची जबाबदारी अजित पवार यांच्या नियोजन खात्याकडे वर्ग

दिवाळी अंक हे बौद्धीक फराळ पुरवण्याचे काम करतात. वेगवेगळ्या दिवाळी अंकांच्या माध्यमातून वेगवेगळे विषय वाचायया मिळतात. यावेळी मात्र दिवाळी अंकांचे विषय, कार्टून्स, लेख तसेच जाहीरातींवर देखील कोरोना ची छाप बघालया मिळते. दिवाळी अंकांमध्ये 'सामाजिक अंतर', 'कोरोना नंतरचे जग', 'कोरोना मधील आरोग्याची काळजी', 'लॉकडाऊऩ', यांसारखे विषय अधिक दिसतात. यय़ाशिवाय अंकातील लेख, कविता, व्यंग्यचित्र यांच्यावर देखील कोरोनाची छाप बघायला मिळतेय. 

major impact on diwali special magazines amid corona more than 100 magazines disappeared


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: major impact on diwali special magazines amid corona more than 100 magazines disappeared