दोन दिवस झाले रुग्णालयात आलोय, कोरोना रिपोर्ट येईपर्यंत उपचार केले नाहीत, इथे जमिनीवर झोपवतात हो...

दोन दिवस झाले रुग्णालयात आलोय, कोरोना रिपोर्ट येईपर्यंत उपचार केले नाहीत, इथे जमिनीवर झोपवतात हो...

मुंबई - दोन दिवस झाले मी केईएम रुग्णालयात दाखल झालो आहे. न्यूमोनिया झाल्याने मी इथे आलो होतो. त्यानंतर माझी कोविड 19 ची चाचणी केली जी आज पॉझिटिव्ह आली आहे. कोविडचा रिपोर्ट येईपर्यंत कोणत्याही प्रकारचे उपचार केले गेले नाहीत. फक्त औषधं सुरु आहेत. बेड नाही जमिनीवर झोपवले आहे असा आक्रोश दोन दिवसांपूर्वी न्यूमोनिया झाला म्हणून केईएममध्ये दाखल झालेल्या संजय रणदिवे यांनी केला आहे. 

संजय रणदिवे यांनी रुग्णालयातील सध्याची परिस्थिती सांगणारा एक व्हिडिओ शूट केला आहे. त्यात त्यांनी रुग्णालयात कशा पद्धतीने कोविड किंवा इतर रुग्णांना उपचार दिले जात आहेत किंवा नाही याची माहिती दिली आहे. ज्यात त्यांनी कोविड नसलेल्या रुग्णाला ही कोविडच्या वॉर्डमध्ये दाखल केले जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. ज्यामुळे, कोविड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय, गेल्या दोन दिवसांपासून आपण डॉक्टरांकडे बेडची मागणी करत असुन रुग्णालय प्रशासन यावर लक्ष देत नाही असे ही त्यांचे म्हणणे आहे. 

साध्या तापाचे रुग्ण ही कोरोना पॉझिटिव्ह

कोरोना वॉर्डमध्ये दाखल केल्यामुळे साध्या तापाचे रुग्ण ही कोरोना पॉझिटिव्ह येत असल्याचा अनुभव रणदिवे यांनी व्हिडिओत सांगितला आहे. रणदिवे हे जमिनीवरिल एका पुठठयावर झोपले असल्याचे या व्हिडिओत दिसत आहेत. त्यांनी आपल्या व्हीडीओतून आपल्याला तत्काळ बेड उपलब्ध व्हावा अशी मागणी केली आहे. 

कोविड रुग्णांवर मोफत उपचार केले जात असल्याचे सांगुन ही तब्बल 1700 रुपयांची औषधं बाहेरुन आणली असल्याचं ही सांगण्यात आले आहे. रणदिवे यांनी केईएममध्ये असलेल्या परिस्थितीवर भाष्य करणारा हा व्हिडिओ तयार करुन लवकरात लवकर बेड आणि उपचार मिळावेत यासाठी विनंती केली आहे

man goes live from KEM hospital of mumbai and shows how patients are treated in hospital

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com