नाश्त्यात मीठ जास्त झाल्याने पतीने केली पत्नीची हत्या; ठाण्यातील दुसरी घटना |Crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Murder case

नाश्त्यात मीठ जास्त झाल्याने पतीने केली पत्नीची हत्या; ठाण्यातील दुसरी घटना

ठाणे जिल्ह्यात घरगुती किरकोळ घटनांवरुन महिलांच्या हत्याप्रकरणांमध्ये वाढ होताना दिसत आहे. भाईंदर टाऊनशिपमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने नाश्त्यात मीठ जास्त झाल्याने आपल्या 40 वर्षीय पत्नीची हत्या केल्याची बाब उघडकीस आली. या प्रकरणावरुन ठाण्यात खळबळ उडाली आहे. (Man killed wife after getting angry over excess salt in breakfast)

भाईंदर पूर्वेकडील फाटक रोड परिसरात शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीचे नाव वर्षीय निलेश घाघ आहेत.

हेही वाचा: उद्धव ठाकरेंना चॅलेंज, हिंमत असेल तर आमने-सामने चर्चा करा - सोमय्या

सकाळी 9.30 च्या सुमारास पत्नी निर्मलाने न्याहारी केली. पत्नीने दिलेल्या 'खिचडी'मध्ये जास्त मीठ असल्याने आरोपी पती संतापला आणि त्याने चक्क पत्नीची कपड्याने गळा आवळून हत्या केली. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली.

हेही वाचा: Photo Story: रेल्वे अपघातामुळे मुंबई लोकलचा खोळंबा; स्थानकांवर तुडुंब गर्दी

ठाण्यात घरगुती हिंसाचार आणि हत्येच्या प्रकरणात वाढ होताना दिसतेय. या आठवड्यात गुरूवारी ठाण्यातील राबोडी भागात अशाचं प्रकारची घटना घडली होती. चहासोबत नाश्ता वेळेवर न दिल्याने संतापलेल्या सासऱ्याने सुनेवर गोळी झाडली होती. शुक्रवारी सकाळी खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

Web Title: Man Killed Wife After Getting Angry Over Excess Salt In Breakfast Police Arrested Him

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top