Konkan Mango News : हंगामाची सुरवात अन् आंबा बागायतदार आले चिंतेत, काय आहे कारण ?

आंबा उत्पादकांची वाढती चिंता; प्रतिकूल हवामानामुळे मोहोराची प्रक्रिया प्रभावित
Mango
Mango sakal

Konkan Mango News: गेल्या काही दिवसांपासून बोर्डी परिसरात प्रतिकूल वातावरणामुळे आंब्याला मोहोर येण्याची प्रक्रिया लांबली आहे. मागील चार दिवसांपासून ढगाळ वातावरण व संध्याकाळच्या वेळी धूरसदृश हवामान निर्माण होत असल्यामुळे आंबा बागायतदार, तसेच भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

डहाणू तालुक्याच्या उत्तरेकडील नरपड, चिखले, घोलवड, बोर्डी, रामपूर, अस्वली, जांबुगाव, चिंबावे, वाकी, झारली अशा सुमारे १५ गावांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात चिकू, आंबा बागायती विकसित झाल्या आहेत. साधारणपणे दरवर्षी डिसेंबर ते जानेवारीमध्ये आंब्याच्या झाडांना मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू होते, असा बागायतदारांचा अनुभव आहे.(konkan mango farming)

Mango
Mango Board : स्वतंत्र आंबा बोर्डासाठी 200 कोटींची तरतूद; रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना होणार फायदा

परंतु मागच्या सात-आठ वर्षांपासून डिसेंबरमध्ये अपेक्षित थंडी पडत नसल्यामुळे मोहोर येण्याची प्रक्रिया फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होत असल्याचे दिसून येते.

गेल्या पावसाळी हंगामात सप्टेंबरमध्येच पावसाने काढता पाय घेतल्यामुळे चालू वर्षी मोहोर येण्याची प्रक्रिया लवकर सुरू होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. या अनुषंगाने शेतकऱ्यांनी आंबा बागायतीमध्ये खत-पाणी व्यवस्थापन, तसेच कीटकनाशक फवारणी आदी आवश्यक मशागतीवर मोठ्या प्रमाणात खर्च केला.

परंतु फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत आंब्याच्या झाडांना मोहोर येण्याची प्रक्रिया अतिशय संथ गतीने होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना आंबा बागायतीमध्ये निराशादायी चित्र दिसत असल्याची चर्चा आहे.(konkan mango news)

Mango
Mango Season : यंदा मराठवाड्यात लवकर पिकणार आंबा ; फेब्रुवारीतच मोहरल्या आमराया, ‘केशर’कडून उत्पादकांच्या उंचावल्या अपेक्षा

गेल्यावर्षीही निराशा

२०२३च्या हंगामात आंबा बागायती चांगल्या बहरल्या होत्या; परंतु मेच्या १६ तारखेपासून बिपरजॉय चक्रीवादळाने आंब्याचे पीक झोडपून काढल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. तसेच चिकू बागायतदारांनाही पावसाळी हंगामात फळांची आवक कमी झाल्यामुळे नुकसान झाले होते. चालू वर्षाच्या सुरुवातीपासून काही प्रमाणात परिस्थिती सुधारेल, या आशेने पुन्हा एकदा कामाला लागलेला शेतकरी नैसर्गिक आपत्तीमध्ये गुरफटला गेला आहे.

चालू वर्षी आंब्याला मोहोर येण्याची प्रक्रिया लांबली आहे; परंतु आता हळूहळू तो येऊ लागला आहे. दरवर्षी फेब्रुवारीमध्ये मोहोर येण्याची प्रक्रिया पूर्ण होते. मात्र, चालू वर्षी फार उशीर झाला. त्यामुळे शेतकऱ्याच्या हाती फळे पडेपर्यंत पावसाचा धोका संभवेल काय, अशी भीती आहे.(mango latest news)

- पंकज तुकाराम राऊत, आंबा बागायतदार

चालू वर्षी आंबा बागायतीमध्ये झाडांना मोहोर येण्याची प्रक्रिया लांबली आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पालघर जिल्ह्याच्या पश्चिम भागात थंडीचे प्रमाण अनियमित व कमीच असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मोहोर येण्यासाठी अनुकूल वातावरण निर्मिती झाली नसावी, त्याचा परिणाम दिसून येत आहे.

- विलास जाधव, शास्त्रज्ञ, कोसबाड कृषी विज्ञान केंद्र

Mango
Roasted Mango Benefits : फ्राय केलेल्या आंब्याचा ज्यूस अनेक गोष्टींसाठी फायदेशीर? एकदा वाचाच!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com