Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचं 'Arrest Warrant' घेवून नाशिक पोलिस मुंबईतील लीलावती रूग्णालयात दाखल!

Manikrao Kokate Latest News : कोकाटे यांच्याकडील मंत्रिपदाचा कार्यभार बुधवारी रात्रीच काढून घेण्यात आला होता आणि त्यांची खाती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली होती.
Manikrao Kokate

Manikrao Kokate

esakal

Updated on

Nashik Police reach Mumbai’s Lilavati Hospital : सदनिका गैरव्यहार प्रकरणी अखेर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजीमंत्री माणिकराव कोकाटे यांना अटक वॉरंट बजावण्यासाठी नाशिक पोलिस रात्री उशीरा मुंबईतील लीलावती रूग्णलायत दाखल झाले. होते. या ठिकाणी कोकाटेंच्या अटकेची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे.

सदनिका गैरव्यहार प्रकरणात माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली गेली आहे. नाशिक पोलिस मुंबईत दाखल झाल्यानंतर वांद्रे पोलिसांशी चर्चा करून आणि उपचार करत असलेल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन कोकाटेंच्या अटकेची कारवाई पूर्ण करत आहेत.

याआधी संध्याकाळी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वीकारला आणि तो मुख्यमंत्र्यांकडे पाठवला होता. यानंतर मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवला होता. त्यानंतर नाशिक पोलिस कोकाटेंच्या अटकेची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अटक वॉरंट घेऊन नाशिकवरून मुंबईत कोकाटे उपचार घेत असलेल्या लीलावती रूग्णालयाकडे रवाना झाले होते.

Manikrao Kokate
Manikrao Kokate latest News : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होणार ; राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला

कोकाटे यांच्याकडील मंत्रिपदाचा कार्यभार बुधवारी रात्रीच काढून घेण्यात आला होताआणि त्यांची खाती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली होती. त्यामुळे काही तास कोकाटे हे बिनखात्याचे मंत्री होते. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी केलेल्या मागणी नंतर कोकाटे यांच्याकडील कृषी खाते काढून घेण्यात आले होते. त्यांच्याकडे सध्या क्रीडा खाते होते.

Manikrao Kokate
Nitish Kumar Hijab Incident : हिजाब घटनेनंतर नितीश कुमारांच्या जीवाला धोका? ; यंत्रणांनी सुरक्षा वाढवली!


कोकाटे यांनी शासकीय सदनिका मिळवण्यासाठी अल्प उत्पन्नाचे खोटे कागदपत्रे सादर केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. या प्रकरणी नाशिक सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यांच्याविरोधात अटक वॉरंटही जारी करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com