esakal | प्लेगपासून बचावलेल्या बीआयटी चाळींमध्ये कोरोनाचे संकट; जाणून घ्या 120 वर्षे जुन्या बीआयटी चाळींविषयी...
sakal

बोलून बातमी शोधा

chawl

1896 मध्ये मुंबईत सुरु झालेल्या प्लेगच्या साथीनंतर  शहरात साथीचे आजार पसरु नये म्हणून बीआयटी चाळी बांधण्यात आल्या. पूर्वी मुंबईत झोपड्यांप्रमाणे घरे होती. मात्र, चाळी बांधण्याची सुरुवात खऱ्या अर्थाने प्लेगच्या साथीनंतर झाली.

प्लेगपासून बचावलेल्या बीआयटी चाळींमध्ये कोरोनाचे संकट; जाणून घ्या 120 वर्षे जुन्या बीआयटी चाळींविषयी...

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई : 120 वर्षापूर्वी मुंबईत आलेल्या प्लेगच्या साथीनंतर गलिच्छ वस्ती निर्मुलनासाठी बीआयटी चाळी उभारण्यात आल्या होत्या. त्यावेळी प्लेगपासून बचाव करण्यासाठी बांधलेल्या या बीआयटी चाळीमध्ये आता कोरोनाचा शिरकाव झाला आहे. ई प्रभागातील माझगाव येथील संत मेरी मार्गावरील 12 नंबरच्या बीआयटी चाळीत तब्बल 76 रुग्ण आढळले आहेत .

अॅण्ड्रॉईड मोबाईलधारकांनो सावधान! हॅकर्सनी विकसित केला मालवेअर...

1896 मध्ये मुंबईत सुरु झालेल्या प्लेगच्या साथीनंतर  शहरात साथीचे आजार पसरु नये म्हणून बीआयटी चाळी बांधण्यात आल्या. पूर्वी मुंबईत झोपड्यांप्रमाणे घरे होती. मात्र, चाळी बांधण्याची सुरुवात खऱ्या अर्थाने प्लेगच्या साथीनंतर झाली. मात्र, या बीआयटी चाळी आणि त्या परिसरात 511 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यात मुंबई सेंट्रल, चिराबाजार, परळ बीआयटी  या चाळीतील कोरोना रुग्णांची संख्या 8  दिवसात काहीशी वाढली आहे.

चित्रपट दिग्दर्शक रजत मुखर्जीं यांचे जयपूरमध्ये निधन....

मुंबई सेंट्रल बेलासीर मार्गावरील बीआयटी संकुल आणि परिसरात 9 जुलै रोजी 41 रुग्ण होते, तर 17 जुलै रोजी 45 रुग्णांची नोंद झाली आहेत. तर परळ येथील बीआयटी चाळींमध्ये 45 रुग्ण होते, तेथे आता 54 रुग्णांची नोंद झाली आहेत. तर चिराबाजर येथील बीआयटी चाळ आणि परीसरात 73 रुग्ण होते, ते 76 झाले आहे.

गटारी असूनही मटनाच्या विक्रीत मोठी घट वाचा 'हे' आहे कारण...

आग्रीपाडा बीआयटी चाळींमध्ये 97 रुग्ण आढळले आहेत. माझगाव  संत मेरी मार्गावरील बीआयटी चाळींमध्ये 127 रुग्ण आढळले आहेत.त्यात एका 12 नंबरच्या चाळीत 76 रुग्ण आहेत. वाडीबंदर माझगाव बीआयटी परिसरात 83 आणि कामाठीपुरा बीआयटीमध्ये 49 रुग्ण आढळले आहेत. तर, भायखळा बीआयटी चाळी आणि परिसरात 64 रुग्ण आढळले आहेत.

रानभाज्या विक्रीच्या हंगामाला लॉकडॉऊनचा फटका; अदिवासी बांधवांची होतेय उपासमार


प्लेगने आणली भाड्याची घराची संस्कृती 
प्लेगच्या साथीच्या काळात 1898 ला ब्रिटीश संसदेत कायदा मंजूर करुन मुंबईच्या विकासासाठी बॉम्बे सिटी इंप्रुव्हमेंट ट्रस्टची (बीआयटी) स्थापना केली. या ट्रस्टच्या शिफारशीनुसार, शिवडी, माझगावपर्यंत असलेले शहर दादर, माटुंगा, शीवपर्यंत वाढविण्यात आले. या ट्रस्टनेच बीआयटी चाळींची उभारणा केली. दक्षिण आणि मध्य मुंबईत या चाळी असून मुंबईत येणाऱ्या कामगारांना भाड्याची घरे या चाळीत मिळत होती. 120 वर्षांपूर्वी सरकारने राबवलेली "रेंटल हाऊसिंग"ची ही पद्धत होती. कालांतराने बॉम्बे इंप्रुव्हमेंट ट्रस्ट अर्थात बीआयटी मुंबई महापालिकेत विलीन झाली. 
---
संपादन : ऋषिराज तायडे

loading image
go to top